फुफ्फुस, यकृत, हृदय, यांना डाळिंब ठेवेल मजबूत




रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण अस रसदार फळ म्हणून डाळिंबाला ओळखले जाते. जगात ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या फळांपैकी हे एक फळ आहे. हे फळ आरोग्‍यासाठी लाभदायक फळ म्‍हणून ओळखले जाते.

चवदार डाळिंबामध्‍ये व्हिटामिन्‍स ए, सी, ई, बरोबरच फ्लोरीक अ‍ॅसीड या रासायनिक घटका बरोबराच अँटी ऑक्‍सीडेंट मोठ्या प्रमाणात आहे. डाळिंबाचा प्रत्‍येक भाग शरीरासाठी लाभदायक ठरतो. विविध आजारावर उपाय म्‍हणून या फळाचा आहारात उपयोग करण्‍यात येतो.
पोटाचे आजार डाळिंबामुळे बरे होतात. फुफ्फुस, यकृत, हृदय, याबरोबरच विविध आजारावर डाळिंब हा गुणकारी उपाय आहे. डाळिंबाची साल आरोग्‍यासाठी लाभदाय ठरते.

डाळिंबाचे फायदे -
वाळलेल्‍या डाळिंबाचे पावडर दरराजे पाण्‍यात टाकून सेवन केल्‍यानंतर लघवी करतानाचा त्रास होत नाही.

खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्‍यासोबत सेव केले तर खोकल्‍याची उबळ येणे बंद होते.

साल उकळून या पाण्‍याने गुळना केला तर तोडांचा वास येत नाही.

महिलांना मासिक पाळीच्‍या वेळेला जास्‍त रक्‍त स्‍त्राव होत असेल तर डाळींबाची साल पेस्‍ट करून पाण्‍यामध्‍ये घेतल्‍यानंतर रक्‍त स्‍त्राव होत नाही.

डाळिंबाचे पेस्‍ट आणि दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्‍यानंतर केस गळत नाहीत,केस मुलायम होतात.

अ‍ॅथेरॉसक्‍लेरॅसिस आजारापासून त्रस्‍त असाल तर या आजारावर चांगला आणि सोपा उपाय म्‍हणून डाळिंबाचा उपयोग करता येतो. वाढणारे वय, खाण्‍याची चुकीची पद्धतीमुळे रक्‍त वाहिन्‍या 'टनक' होतात. यामुळे रक्‍तप्रभाहामध्‍ये अडथळा निर्माण होतो. डाळिबामधील अँटीऑक्सिडेंटचे गुण रक्‍तवाहीन्‍यांचे घनत्‍व निर्माण करणा-या लिपोप्रोटीन आणि कॉलेस्‍ट्रॉल यांचे प्रमाण नियंत्रीत करतात. यामुळे रक्‍तवाहिण्‍यांची घनता वाढत नाही. रक्‍तपुरवठा सुरळीत होण्‍यास मदत होते.

कॉलेस्‍ट्रॉल किंवा हृदयाच्‍या आजारावर डाळिंब हे फळ रामबाण उपाय म्‍हणून काम करते. शरीरात रक्‍त दोन पद्धतीने साकाळते. एक तर काही जखम झाल्‍यांनतर किंवा रक्‍तवाहिण्‍याच्‍या आतंर्गत आडचणामुळे रक्‍त जमा होते. अशा प्रकारचे रक्‍त जमा होणे आरोग्‍यासाठी धोकादायक असते. आहारात डाळिंबाचा जास्‍तीत जास्‍त वापर शरीरातील रक्‍त पुरवठा सुरळीत करतो.

डाळिंबाचे नियमीत सेवन केले तर डीएनए ऑक्‍सीडेशनची प्रक्रिया मंदावते. याचे मुख्‍य कारण म्‍हणजे डाळिंबातील अँटीऑक्‍सीडेंट असल्‍याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. वाढत्‍या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडाइजिंगचे प्रमाण् नियंत्रीत ठेवण्‍याचे प्रमाण डाळिंब करते.

डाळिंबाच्‍या पानाचा चहा करून प्‍यायल्‍यानंतर पचनसंस्‍थेतील आडचणी दूर होतात. कॉलरा सारखा आजारावर डाळिंबाचे ज्‍यूस लाभदायक उपाय असल्‍याचे संशोधकांचे मत आहे. शुगर आजार असलेल्‍या व्‍यक्तिने डांळीबाचा रस प्‍यायल्‍यानंतर कॉरोनरी आजारापासून बचाव करावा लागतो.

डाळिंबाचे फळ आहारात घेतल्‍याच किंवा डाळिंबाचे ज्यूस ‍नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. डाळिंबाच्या ज्यूसमुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो. एवढेच नव्हेत व्यक्तिची स्मरणशक्ती वाढते व त्याचा मूडही चांगला राहतो.

जर एखादा पुरुष तसेच महिला दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस नियमित घेत असेल तर त्यांना वायग्रा खाण्‍याची गरजही भासत नाही. डाळिंबाचे ज्यूस वायग्रापेक्षाही प्रणय पॉवर वाढविण्‍यासाठी मदतगार ठरते.

संशोधनासाठी 21 ते 64 वयोगटातील 58 स्त्री-पुरूषांना बोलावण्यात आले होते. त्यापैका काही लोकांना डाळिंबाचे ज्यूस देण्यात आले. तर काही वायग्रा देण्यात आले. अभ्यासात असे दिसून आले की, डाळिंबाचे ज्यूस घेतलेल्या पुरुषांसह स्त्रियांमध्येही प्रणय पॉवर वाढल्याचे जाणवले.



थोडे नवीन जरा जुने