'कारले' या गंभीर आजारांवर रामबाण उपाय




ज्या लोकांना कारल्याची भाजी त्याच्या कडवटपणामुळे आवडत नसेल कदाचित त्यांना कारल्यातील औषधी गुणांची माहिती नसावी. आज आम्ही तुम्हाल कारल्यातील खास औषधी गुणांची आणि याच्या खास रामबाण उपायांची माहिती देत आहोत.


कारल्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थोड्याप्रमाणत वसा, व्हिटॅमिन ए, सी, आणि इतरही पोषक तत्त्व आढळून येतात.

कारले शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. वजन घटवण्यापासून ते मधुमेह, मुतखड्यासारख्या समस्यांना दूर ठेवण्यापर्यंत कारल्याचा उपयोग होतो.
कारले यकृताच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ते यकृत स्वच्छ ठेवते आणि त्यांच्या पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. त्यामुळे यकृत दीर्घकाळापर्यंत चांगल्या प्रकारे काम करू शकते.


उलट्या किंवा जुलाब होत असल्यास कारल्याच्या रसात थोडे पाणी मिसळून, त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे लगेचच फरक पडतो. जेवणात कारल्याच्या भाजीने पचन चांगले होते. पोटात गॅस अपचन झाल्यास कारल्याचा रस घ्यावा.
पक्षाघात झालेल्या रुग्णांना कच्चे कारले फायदेशीर ठरते. दमा असलेल्यांनी मसाला न टाकलेली कारल्याची भाजी खाल्ल्यास फायदेशीर कारले रक्तशुद्धीही करते.


टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले अतिशय गुणकारी आहे. ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी मदत करते. तर तुमचे पोट वाढले आहे का, लठ्ठपणा आहे का. त्यावर कारले गुणकारी ठरते.


कारले पचनासाठी उत्तम आहे. त्यामधील अँटिऑक्सिडंट्स चयापचय क्रियेचा वेग वाढवतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने खर्च होतात. खुद्द कारल्यात अतिशय कमी प्रमाणात कॅलरीज असतात. वजन घटवण्यासाठी डाएटमध्ये कारले हवेच.


मुतखड्याच्या रुग्णांसाठी कारले उपयुक्त आहे. कारल्याच्या सेवनामुळे मुतखडे फुटून ते मूत्रमार्गाने बाहेर पडू शकतात.
तारुण्यपिटिकेसाठी ते महत्त्वाचे ठरले आहे. कारल्यात अँटी इन्फ्लामेटचे गुण आहेत जे त्वचेतून हानीकारक घटकांना दूर करतात. त्यामुळे तारुण्यपिटिका किंवा त्वचेवरील पुटकुळ्यांची समस्या दूर होते.


कारले नियमितपणे सेवन केल्यास दमा आणि ब्रोंकाइटीससारख्या श्वासासंबंधी गंभीर आजारांवर मात करू शकता. कर्करोगाशी सामना करण्यासाठी कारले गुणकारी आहे. हे आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी ते शरीराला मदत करते.



थोडे नवीन जरा जुने