जास्त चॉकलेट खाणे आरोग्यासाठी हितकारक कसे ते वाचा
चॉकलेटची चवच अशी असते, ज्यामुळे चॉकलेटचे नाव काढताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलं चॉकलेट खातात म्हणून घरातील वडीलधारी मंडळी त्यांना चॉकलेट न खाण्याचा सल्ला देतात.
यामागचे एक कारण म्हणजे चॉकलेटमध्ये असलेल्या फायदेशीर गुणांची माहिती नसणे. जास्त चॉकलेट खाणे आता आरोग्यासाठी हितकारक असल्याचा शोध लागला आहे.

जाणून घ्या चॉकलेट खाण्याचे फायदे -

हृदयासाठी लाभदायक -

हृदयरोगासारख्या अनेक गुंतागुंतीच्या परिस्थितीत चॉकलेट मदतगार ठरते, असा संशोधकांचा दावा आहे. चॉकलेटमध्ये कॉपर आणि पोटॅशिअम आढळून येते, जे हृदयाशी संबधित आजारांना दूर ठेवतात. चॉकलेटमुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.

ब्लडप्रेशरमध्ये लाभदायक -
चॉकलेट खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवेनॉल आणि अँटी ऑक्सीडेंट तत्व असतात. आठवड्यातून दोन-तीनदा थोड्या-थोड्या प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यास ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.


वेदना कमी होतात -
चॉकलेट खाल्ल्याने शरीरात एण्डोफिजिन नावाचे हार्मोन उत्सर्जित होते. यामुळे चॉकलेट खाल्ल्यास वेदना कमी होतात. हे नैसर्गिक पेनकिलरप्रमाणे काम करते.

डायबिटीजमध्ये लाभदायक :

डार्क चॉकलेटमधील फ्लॅओनॉईडस् आणि ग्लायकेमिक रसायन शरीरातील इन्सुलिनची पातळी योग्य प्रमणात ठेवते. डार्क रचॉकले खाल्लाय्ने रक्त प्रवाह सुरळीत राहतो आणि रक्तातील साखरेच्या प्रमाणाची पातळी योग्य राहते.


चॉकलेटमध्ये थेओब्रोमाईन नावाचा एक महत्त्वपूर्ण रासायनिक घटक आढळून येतो. थेओब्रोमाईन हे कफ आणि सर्दीसाठीही गुणकारी असते.

तणाव दूर करण्यासाठी :

चॉकलेटमध्ये मूड ठीक करणारे आणि तणाव दूर करणारे गुण आढळून येतात. जेव्हा तुमचा मूड खराब असेल तेव्हा थोडेसे चॉकलेट खाल्ल्यास आराम मिळेल.

मानसिक आजारामध्ये -
चॉकलेटमध्ये फ्लेवेनॉल तत्व आढळून येते. फ्लेवेनॉलमुळे रक्तसंचार व्यवस्थित राहतो. यामुळे चॉकलेट खाल्ल्यास मानसिक आजारामध्ये लाभ होतो.

थोडे नवीन जरा जुने