मनुक्यांच्या नियमित सेवनाने थोड्याच दिवसात हे बदल दिसतील

द्राक्षे जेव्हा विशेष पद्धतीने सुकवली जातात तेव्हा त्यांना मनुके म्हणतात. द्राक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्यात असतात. हे दोन प्रकारचे असतात - लाल आणि काळे. मनुका पचायला जड, मधुर, शीतल वीर्यवर्धक, तृप्तीकारक, वातानुलोमक (अपानवायू सहजतेने मोकळा करणारा) कफ-पित्तहारी, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक, रक्तशोधक तसेच रक्तप्रदरातही लाभदायी आहे.

मनुक्यांच्या नियमित सेवनाने थोड्याच दिवसात रस, रक्त, शुक्र इ. धातूंची तसेच ओजाची वृद्धी होते. वृद्धावस्थेत मनुक्यांचा प्रयोग केवळ आरोग्यरक्षणच करतो असे नाही तर आयुष्य वाढविण्यातही सहाय्यक असतो. मनुक्यातील शर्करा अतिशीघ्र पचून अंगी लागते, ज्यामुळे त्वरित शाकी व स्फूर्ती मिळते.

शरीरात रक्ताची कमी ( रक्ताल्पता ) - मानुक्यात लोह व सर्वच जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. १०-१५ ग्रॅम काळे मनुके १ वाती पाण्यात भिजत ठेवावेत. यात थोडासा लिंबाचा रस टाकावा. ४-५ तासांनी मनुके चावून-चावून खावेत. यामुळे रक्ताल्पता दूर होते.

दारूच्या व्यसनापासून मुक्ती - दारू पिण्याची इच्छा होईल तेव्हा दरुएऐवजि १० ते १२ ग्रॅम मनुका चावून-चावून खात रहावे अथवा मनुकाचे सरबत करून प्यावे. दारू पिल्याने ज्ञानतंतू सुस्त होतात, परंतु मनुकाच्या सेवनाने ज्ञानतंतूंना लगेच पोषण मिळाल्याने मनुष्य उत्साह, शक्ती व प्रसन्नतेचा अनुभव करु लागतो. हा प्रयोग प्रयत्नपूर्वक करीत राहिल्याने थोड्याच दिवसात दारूचे व्यसन सुटते.

दौर्बल्य - अधिक परिश्रम, कुपोषण, वृद्धावस्था अथवा एखाद्या मोठ्या आजारानंतर शरीर जेव्हा क्षीण होते, तेव्हा त्वरित शक्ती मिळवण्यासाठी मनुका खूपच लाभदायी आहेत. १०-१२ मनुका २०० मि.ली. पाण्यात भिजत ठेवा आणि दोन तासांनी खाऊन टाका.

आवश्यक सूचना - किशमिश, मनुके, अंजीर हे चांगले धुतल्यावरच वापरावे, जेणेकरून यांच्यावरील धूळ, माती, किडे, जंतुनाशक औषधांचा प्रभाव निघून जाईल.


थोडे नवीन जरा जुने