फॅट कमी करण्यासाटी लक्षात ठेवा 'या' गोष्टी करा
तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात रनिंग किंवा जॉगिंग करणे उष्ण वातावरणाच्या तुलनेत जास्त चांगले असते. यादरम्यान शरीर अधिक उष्णता निर्माण करते, त्यामुळे हिवाळ्यात व्यायाम करणे हानिकारक ठरत नाही.

मेद (फॅट) कमी करण्यासाठी हिवाळा हा सर्वात अनुकूल काळ आहे. हिवाळ्यात व्यायामाचे वेळापत्रक कसे पाळायचे आणि जॉगिंग करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

लक्ष्य निश्चित करा -

तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जॉगिंग किंवा रनिंगचे वेळापत्रक पाळणे कठीण असले तरी लक्ष्य निश्चित केल्यास तुम्ही रुटीन कायम ठेवू शकता. महिनाभर तुम्ही व्यायामाचे वेळापत्रक पाळले वा नाही, याची डायरीत नोंद करून ठेवावी. जर तुम्ही यशस्वी झाला तर स्वत:च पाठ थोपटून घ्यावी.


रस्त्याची योग्य निवड -

जॉगिंगसाठी नेहमी सपाट रस्त्याचीच निवड करावी. तज्ज्ञांच्या मते चढउतार असलेल्या रस्त्यावरून धावल्यास मसल्स इंज्युरी होते म्हणजेच स्नायूंमध्ये आकस निर्माण होणे किंवा चमक निघण्याची शक्यता असते. सपाट रस्त्यावरून धावणे कधीही सोईचे ठरेल.


योग्य पोशाख -

जॉगिंग करताना हिवाळ्यात घालण्यात येणार्‍या कपड्यांकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हिवाळ्यात लोकरी वा उष्ण कपडे घालूनच व्यायाम करणे योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे; परंतु ते चुकीचे आहे. तज्ज्ञांच्या मते नेहमी हलके व सैल कपडे घालावेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी हातमोजे व कानपट्टी घालू शकता. तसेच पायात सुती मोजे व फीट बूट घालू नये.


वॉर्मअप करावे -

हिवाळ्यामध्ये हळूहळू मात्र जास्त वॉर्मअप करावा. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात दिवसांमध्ये स्नायू वॉर्मअप होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे जॉगिंग करण्याच्या 10-15 मिनिटे आधी चांगला वॉर्मअप करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्नायू लवचीक होतात.

पाणी कमी पडू देऊ नये -
उन्हाळ्यासारखेच हिवाळ्यातही शरीरातील पाणी कमी होत असते. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात भलेही जास्त घाम येत नसेल; परंतु शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. जॉगिंगला जाताना कोमट पाण्याने भरलेली बाटली सोबत ठेवावी. जर तुम्ही 45 मिनिटांची जॉगिंग करीत असाल तर तुम्हाला एक बॉटल पाणी प्यायला हवे.
इतर उपक्रमात सहभाग -
जेव्हा तुमचे सकाळच्या जॉगिंगचे वेळापत्रक कोलमडते तेव्हा तुम्हाला कंटाळा आल्यासारखे वाटते. यासाठी इतर उपक्रमांमध्ये सहभागी होणे हा सर्वांत चांगला पर्याय आहे. वैविध्यामुळे तुम्ही कोणतेही काम आनंदाने करू शकाल. अशा वेळी हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळ हा सवरेत्तम पर्याय आहे.


हेही लक्षात ठेवा -

सकाळी जॉगिंगला जाण्यापूर्वी हात, ओठ, नाक व कानांना पेट्रोलियम जेली लावावी. कारण त्वचेचा हा उघड्यावरील भाग हवेच्या संपर्कात आल्याने त्वचा कोरडी होते.


मित्रांनाही सोबत घ्यावे -
जॉगिंग करताना मित्रमंडळी वा जीवनसाथी सोबत असल्यास तुम्हाला ताजेतवाने असल्यासारखे वाटेल. तज्ज्ञांच्या मते अशा पद्धतीने तुम्ही तंदुरुस्त राहण्याबरोबरच विविध विषयांवर चर्चाही करू शकता. त्यामुळे तुमचे वेळापत्रकही कायम राहील.


थोडे नवीन जरा जुने