बैठेकाम करत आहात? तर 'हे' नक्की वाचावर्तमान काळात लठ्ठपणा एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा माणुस लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहे. यामुळे अनेक आजार जसे की, डायबिटीज, ब्लड प्रेशर हे झपाट्याने वाढत आहेत. परंतु लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे अदिवासी लोकांमध्ये ही समस्या खुप कमी असते.
त्यांची जीवनशैली आणि वनऔषध्या या सर्व रोगांना त्यांच्या जवळ देखील येऊ देत नाही. आज आपण जाणुन घेऊ अदिवासींचे महत्त्वाचे हर्बल उपाय. जे अवलंबल्याने तुम्ही शरीराची चरबी कमी करु शकता.

1. कारल्याची अर्धकच्ची भाजी देखील वजन कमी करण्यात खुप मदत करते. मध्यप्रदेशाती उत्तरेतील अदिवासी शेवग्याच्या शेंगांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त मानतात.

2. बाभळीचा डिंक पाण्यात मिसळा, ते पाणी कोमट करुन दिवसातून दोन वेळा सेवन केल्याने वजन कमी करण्यात मदत मिळते.

3. लठ्ठ लोकांनी गाजराचे सेवन मोठ्या प्रमाणात केले पाहिजे. खास करुन जेवण करण्याअगोदर गारज खावेत. आधुनिक विज्ञान देखील लठ्ठपणा कमी करण्यासाठी गारजाला उपयुक्त मानते.

4. मध एका कॉम्पलेक्स शर्करे प्रमाणे आहे, जे लठ्ठपणा कमी करण्यात भरपूर मदत करते. गरम पाण्यात एक चमचा मध टाकून नियमित सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने काही काळातच परिणाम दिसतात. काही ठिकाणी लोक या मिश्रणामध्ये एक चमचा लिंबूचा रस टाकतात, हे दोन्ही फॉर्मूले फायदेशीर असतात.

5. ताज्या पत्ता गोभीचा रस वजन कमी करण्यात खुप मदत करतो. अदिवासींप्रमाणे रोज सकाळी हिरवी पत्ता गोभी बारीक करुन त्याचा रस काढून प्या. हे शरीराची चरबी कमी करण्यात मदत करते. महत्त्वाची गोष्टी म्हणजे आधुनिक विज्ञान देखील ही गोष्ट सांगते की, कच्ची पत्ता गोभी साखर आणि अन्य कार्बोहायड्रेटला चरबीमध्ये रुपांतरीत होण्यापासुन वाचवते. यामुळे हे वजन कमी करण्यात सहाय्यक असते.

6. अर्धा चमचा बडी सोप घ्या आणि ती उकळत्या पाण्यात टाका. हे 10 मिनिटे झाकून ठेवा आणि गार झाल्यावर पिऊन घ्या. तीन महिने नियमित जर असे करत राहिलात तर वजन कमी होण्यात मदत होते.

7. पुदीन्याची ताजी हिरवी चटनी बनवली आणि चपाती सोबतच सेवन केली तर फायदा होतो. अदिवासी पुदीन्याची चहा पिण्याचा सल्ला देतात.

8. हरडा आणि बेहडाच्या फळांचा एक चमचा चुर्ण घ्या. हे 50 ग्राम पडवळच्या ज्यूसमध्ये टाकून नियमित सेवन करा. यामुळे वजन लवकर कमी व्हायला लागते आणि शरीरिक थकवा कमी होतो.

9. सुंट, दालचीनीची साल आणि काळ्या मि-यांची पावडर बनवा. या पावडरचे दोन भाग करुन एक भाग सकाळी उपाशापोटी आणि दुसरा रात्री झोपण्या अगोदर घेतला पाहिजे. हे पावडर पाण्यात मिसळून देखील पिता येऊ शकते.


थोडे नवीन जरा जुने