म्हणून तुमची उंची वाढत नाही हा आयुर्वेदिक उपाय करून पहा फायदा होईल
शरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा हार्मोन्स योग्य प्रकारे विकसित न झाल्यामुळे काही लोकांची उंची वाढत नाही. विशेषतः आपली उंची वाढण्यामागे सर्वात मोठे योगदान ह्युमन ग्रोथ हार्मोन म्हणजे 'एचजीएच' चे असते.


एचजीएच पिट्युटरी ग्लँडमधून निघते. हेच कारण आहे, की योग्य प्रोटीन आणि न्युट्रिशन न मिळाल्यामुळे शरीराची वाढ खुंटते. जर तुमच्यासोबतही अशीच समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला उंची वाढवण्याचे काही आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत.

1. उपाय - अश्वगंधा आणि सुकलेली नागोरी या दोन्ही वनस्पतींना आयुर्वेदामध्ये शरीराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.
सामग्री -
- २० ग्रॅम सुकलेली नागोरी
- २० ग्रॅम अश्वगंधा
- २0 ग्रॅम साखर
तयार करण्याचा विधी - सुकलेली नागोरी आणि अश्वगंधाचे मूळं बारीक करून घ्या. या चूर्णामध्ये समान मात्रेत साखर मिसळा. हे मिश्रण काचेच्या बाटलीत ठेवा.

अशा पद्धतीने करा सेवन - रात्री झोपताना दररोज दोन चमचे हे चूर्ण घ्या. त्यानंतर गाईचे दुध प्या. यामुळे उंची वाढेल तसेच तब्येत सुधारेल.
(अश्वगंधाच्या नागोरी, जवाहर, असगंद आदी 20 सुधारित जाती आहेत.)

2. उपाय - काळे तीळ आणि अश्वगंधा चूर्णचे हे मिश्रण नियमित खाल्ल्यास उंची वाढण्यास मदत होईल.

सामग्री=अश्वगंधा, चूर्णकाळे, तीळ,खारीक,गाईचे तूप
तयार करण्याचा विधी - १ ते २ ग्रॅम अश्वगंधा आणि १ ते २ ग्रॅम काळे तीळ बारीक करून चूर्ण तयार करा.

अशा पद्धतीने सेवन करा - हे चूर्ण ३ ते 5 खारकामध्ये मिसळून ५ ते २० ग्रॅम गाईच्या तुपासोबत एक महिनाभर खाल्ल्यास लाभ होईल.

3.उपाय - केवळ अश्वगंधा चुर्णाचे सेवन केल्याने उंची वाढण्यास मदत होते.
सामग्री -अश्वगंधाचे मूळ, साखर,दुध

तयार करण्याचा विधी - अश्वगंधाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये समान मात्रेत साखर मिसळा.

अशा पद्धतीने सेवन करा - २ चमचे हे मिश्रण एक ग्लास दुधामध्ये टाकून प्यावे. रात्री झोपण्यापूर्वी ४५ दिवस या मिश्रणाचे सेवन केल्यास शरीर पिळदार बनेल तसेच उंची वाढेल.

पथ्यफास्ट फूड किंवा जंक फूड खाऊ नका.
जास्त तिखट, मसाला असलेले पदार्थ खाऊ नका


ताडासनहे आसन अतिशय सोपे आहे. सरळ दोन्ही पायांवर सारखा भार टाकून उभे राहा. पाय जुळालेले असू द्या. शरीर स्थिर असू द्या. श्वासावर ध्यान केंद्रित करा. हळूवारपणे दोन्ही हात वरच्या दिशेने न्या. श्वास घेत हात वरच्या दिशेने खेचा. चवड्यांवर उभे राहा. शरीराचे संतुलन साधा. या स्थितीत काही काळ थांबा. श्वास कोठेही रोखून धरू नका. हळूहळू पूर्वस्थितीत या. हे आसन अभ्यासाने अधिक काळापर्यंत करता येते. सुरुवातील अर्धा मिनिटापर्यंत हे आसन करा. या आसनाची 5/10 आवर्तने करू शकता.

लाभ

काहीजण आपल्या उंचीवर समाधानी नसतात. त्यांनी ताडासन करावे. ताडासनामुळे उंचीत वाढ होते.

भुजंगासन

जमिनीवर पोटावर पालथे झोपा. दोन्ही पाय आणि पंजे परस्पर जुळलेले असावेत. पायाचे अंगठे मागील बाजूस खेचावेत. दोन्ही हात डोक्याकडे लांब करावे. पायाचे अंगठे, बेंबी, छाती, कपाळ आणि हातांचे तळवे जमिनीवर एकाच रेषेत असावेत.


आता दोन्ही हात कंबरेजवळ घेऊन जा. डोके आणि कंबर वर उचलून शक्य होईल तेवढे मागील बाजूस वळवा. बेंबी जमिनीस टेकवा. संपूर्ण शरीराचे वजन हाताच्या पंजावर येईल. शरीराची स्थिती कमानी सारखी होईल. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकावर दबाव केंद्रित राहील. चित्तवृत्ती कंठात आणि दुष्टी आकाशाकडे स्थिर करा.
२० सेकंद हीच स्थिती ठेवा. नंतर डोके हळूहळू खाली घेऊन या. छाती जमिनीला टेकवा. नंतर डोकेसुद्धा जमिनीवर टेकवा. दररोज ८ ते १० वेळा हे आसन करावे.


थोडे नवीन जरा जुने