बाप रे ! आपल्या आजूबाजूला असलेल्या वनस्पतींचा येवढा फायदा
विविध वनस्‍पती पूजेसाठी वापरण्‍यात येतात हे आपल्‍याला माहितच आहे. याशिवाय वनस्‍पतींचा वेगवेगळ्या आजारांवरही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विशेष म्‍हणजे आदिवासी या वनस्‍तीचा आपल्‍या रोजच्‍या आहारातही वापर करतात त्‍यामुळे त्‍यांचे आजारी पडण्‍याचे प्रमाण खूप कमी आहे.


जंगलातील विविध्‍ वनस्‍पतीचा आणि जडी-बूटीचा औषधात वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्‍या वनस्‍पती औषध म्‍हणून आदिवासी वापरतात त्‍या वनस्‍पतीची अगोदर पूजा केली जाते.

या वनस्‍पतीची पूजा करून सेवन केले तर आजार लवकर बरा होतो असे अदिवासी मानतात. आदिवासी वापरत असेलेल्‍या वनस्‍पती विविध आजारावर गुणकारी उपाय करतात हे वैज्ञानिकांनी सिध्‍द केले आहे.

दुर्वा-

हराळी हा गवताचा प्रकार आहे. पूजेसाठी दुर्वा म्‍हणून या वनस्‍पतीचा वापर केला जातो. आदिवासींनी सांगितले आहे की, दुर्वाचे रोज सेवन केले तर शरीरामध्‍ये चेतना निर्माण होते. थकवा येत नाही. नाकातून रक्त येत असेल तर दुर्वाचे दोन थेंब नाकात टाकल्‍यानंरत रक्‍तस्‍त्राव होत नाही.

मदार-
मदार या वनस्‍पतीला आक या नावाने ओळखले जाते. मदारचे दूध जखमेवर लावल्‍यानंतर जखम लवकर बरी होते.

मका-
वारंवार मकाचा वापर आहारात केला तर शरीराला लागणारी शक्‍ती आणि ऊर्जा मिळते. मकाचा रस प्‍यायल्‍यानंतर कावीळ आजार लवकर बरा होतो. औषधी गुण असल्‍यामुळे आहारात मक्याचा वापर आदिवासी मोठ्या प्रमाणात करतात.

आगाडा-
आगाड्याला आपमार्ग आणि लटजरी नावाणे ओळखले जाते. वजन कमी करण्‍यासाठी या वनस्‍पतीचा वापर केला जातो. या वनस्‍पतीच्‍या मुळ्या रोज चावल्‍यातर दात मजबुत होतात.

कनेरी-
ताप आला असेल तर कनेरीचा उपाय प्रभावी ठरतो. विंचू किंवा साप चावल्‍यानंतर औषध म्‍हणून कनेरीचा वापर केला जातो.

तुळस-

सुक्ष्‍मजीव संक्रमणासाठी तुळस ही औषधी वनस्‍पती मानली गेली आहे. सर्दी, खोकला, पडसे या आजारावर तुळस हा प्रभीव उपाय ठरतो.


केवडा-

ज्‍या महिलेला मासिक धर्मा संबंधीत आजार आहेत. त्‍यांच्‍यासाठी केवडा हा रामबाण उपाय म्‍हणून ओळखला जातो. आदिवासी हर्बल जानकार विविध आजारावर उपाय करण्‍यासाठी केवडा वनस्‍पतीचा वापर करतात.

शमी-
शरीरातील उष्‍णता कमी करण्‍यासाठी 'शमी' वनस्‍पतीचा उपयोग केला जातो. वारंवार लघवीचा त्रास आसले तर या वनस्‍पतीचे पानाचे सेवन करा.

बेलाचे पान-

आदिवासींच्‍या म्‍हणण्‍यानूसार बेलाचे पान शरीरातील दुर्गंध कमी करते.

अर्जुन-

हृदयाच्‍या विकारासाठी अर्जुन वृक्षाची पाने सर्वोत्तम उपाय सांगण्‍यात आला आहे. वजन कमी करण्‍यासाठी या वृक्षाची वापर करण्‍यात येतो.


पींपळ-
स्‍मृरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी, लहान मुलांच्‍या पोटाच्‍या आजारासाठी पींपळाची वनस्‍पती गुणकारी औषध आहे.

अशोक-
महिलांसाठी अशोकाचे झाड हे वरदान असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. गर्भाशय निरोगी ठेवण्‍यासाठी, मासिक धर्मा संबंधीत आजारावर प्रभावी उपाय म्‍हणून अशोक चा वापर केला जातो.

जासवंत-
जासवंत या वनस्‍पतीला 'गुडहल' या नावाने ओळखले जाते. या फुलाचा रस प्‍यायलानंतर मानसीक तान कमी होतो. शांत झोप लागते.

शिवलिंगी- 

गर्भधारणेसाठी या वनस्‍पतीचा वापर केला जातो. शिवलिंगी वनस्‍पतीच्‍या बिया गर्भधारणेसाठी प्रभावी ठरतात.


थोडे नवीन जरा जुने