स्‍मरणशक्‍ती वाढवणारे मसालेमहिती तंत्रज्ञानाच्‍या आणि स्‍पर्धेच्‍या युगात माणसाने निर्सगाचा -हास केला आहे. मात्र निर्सगाने माणसांसाठी कही वरदान देऊन ठेवले आहेत. निर्सगात काही वनस्‍पती अशा आहेत ज्‍यामुळे आरोग्‍य निरोगी राहते.
निरोगी आरोग्‍याबरोबरच स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी काही औषधी वनस्‍पती निर्सगामध्‍ये उपलब्ध आहेत. या वनस्‍पतींमुळे माणूस निरोगी राहतो, अयुष्‍य वाढते.
आज आम्‍ही आपल्‍याला स्‍मरणशक्‍ती वाढवणा-या व मसाल्‍यामध्‍ये वापरण्‍यात येणा-या काही वनस्‍पतींची माहिती देत आहोत. हे मसाले आरोग्‍य निरोगी ठेवण्‍याबरोबर स्‍मरणशक्‍ती वाढवतात.

स्‍मरणशक्‍ती वाढवणारे मसाले
ग्रीन टी-
ग्रीन टी शरिरासाठी गुणकारक असुन बाजारामध्‍ये सहजासहजी उपलब्ध होतो. यामध्‍ये निरोगी राहण्‍यासाठी लागणारे एंटीऑक्‍सीडेंट मिळतात. ग्रीन टी रोज घेतला तर शरीर निरोगी राहते. दिवसभरामध्‍ये दोन ते तीन कप ग्रीन टी घेतला तर स्‍मरणशक्‍ती वाढते.

हळद-
वाळलेल्‍या हळदीचे कंद कुटुन रोजच्‍या वापरासाठीची हळद तयार केली जाते. स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी हळद हे गुणकारी औषध आहे. स्‍वयंपाक चवीचा बनवण्‍यासाठी हळदीचा वापर करण्‍यात येतो. मात्र याबरोबरच स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍याचे महत्त्‍वाचे काम हळद करते. ज्‍या व्‍यक्तिला अल्झायमर होण्‍याची भिती असेल, त्‍याने आहारामध्‍ये रोज हळदीचा वापर करावा.

जाणून घ्‍या मसाल्‍याचे महत्त्व,-
ओवा-
स्‍वयंपाकामध्‍ये भाजी खमंगं आणि चवदार बनवायची असेल तर भाजीमध्‍ये ओवा वापरावा लागतो. निरोगी शरिरासाठी आणि धडधाकट राहण्‍यासाठी आहारामध्‍ये ओव्‍याचा वापर करावा. ओव्‍यामध्‍ये उंटीऑक्सीडेंट असल्‍यामुळे स्‍मरणशक्‍ती वाढते. अरोमा थेरेपीमध्‍ये ओव्‍याचा वापर करतात.

काळे मिरे-
मसाल्‍याचा पदार्थ म्‍हणून काळे मिरे स्‍वयपाक घरामध्‍ये पाहायला मिळतात. काळे मिरे आहारामध्‍ये वापरले तर शरिर आखडत नाही, शरिराला सैल ठेवण्‍याचे काम काळे मिरे करतात. नैराश्‍यामध्‍ये काळे मिरे आहारामध्‍ये घेतले तर मेंदूवराचा ताण कमी होता. स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी आहारामध्‍ये काळे मिरे वापरा.

दालचीनी-
एल्‍झाइमर आजार असणा-याला सर्वात स्‍वस्‍त आणि चांगला उपाय मानला जातो. आहारमाध्‍ये दालचीनीचा नियमीत केल्‍यास स्‍मरणशक्‍ती वाढते.


जायफळ-
चांगली चव आणि सुगंधी वनस्‍पती म्‍हणून जायफळ ओळखले जाते. मेंदू निरोगी ठेवण्‍याचे महत्‍वाचे काम जायफळ करते. स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी जायफळ महत्‍वाचे काम करते.

तुळस-
हिंदू धर्मामध्‍ये तुळसीला देवी मानले जाते. अनेक आजारावर गुणकारी उपाय म्‍हणून या नस्‍पती ओळखली जाते. रोज दोन-चार पाने खाल्‍ल्‍याने विसराळूपणा कमी होतो.

केसर-
हा मसाल्‍याचा पदार्थ म्‍हणून ओळखला जातो. निद्रानाश आजार असणा-याने औषध म्‍हणून केसरचे नियमित शेवन केल्‍यास हा आजार बरा होतो.

थोडे नवीन जरा जुने