स्ट्रेच मार्क्सपासून कायमचे दूर रहायचंयप्रत्येक महिलेला स्ट्रेच मार्क्सच्या त्रासाचा सामाना करावा लागत असतो. सामान्यत: शरिराची त्वचा प्रमाणाच्या बाहेर स्ट्रेस झाल्याने असे स्ट्रेच मार्क्स तयार होण्यास सुरूवात होते. त्वचा ओव्हर स्ट्रेस झाल्यामुळे त्वचेच्या आतील (मिडल लेअर्स) फायबर्स ब्रेक होतात.
स्ट्रेच मार्क्सचा त्रास हा प्रेगनंन्सी , बॉडी बिल्डिंग, एक्स्ट्रा वेट गेन आणि कधी कधी वय वाढल्यामुळे देखील उद्भवू शकतो. या स्ट्रेस मर्क्सपासून मुक्ती मिळू शकते. यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे जरूरी आहे.

स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय...

आपल्या शरिरात त्वचेचे एपीडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस असे तीन मुख्य स्तर असतात. साधारण त्वचेच्या मिडल स्तरावर अथवा डर्मिस त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येतात. याचे मुख्य कारण ही त्वचा नाजूक नसल्याने थोडासा दबाव पडल्यास स्ट्रेच मार्क्स तयार होण्यास सुरूवात होते. स्ट्रेच मार्क्सची समस्या तारूण्यात अथवा प्रेगनंन्सीच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता असते.

अ‍ॅलोव्हेरा...

त्वचेच्या संबंधित वेगवेगळ्या रोगांपासून सुटका होण्यासाठी अ‍ॅलोव्हेरा हे अतिशय लाभदायक आहे. यामध्ये मिळणा-या तत्वांपासून स्ट्रेच मार्क्स दूर होण्यास मदत झाली आहे. जेथे स्‍ट्रेच मार्क्‍स झाले आहे त्या ठिकाणी अ‍ॅलोव्हेराने मसाज केल्याने त्‍वचा टोन होण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या एनजाइम खराब झालेली त्‍वचा नष्ट करून नवीन त्वचा तयार करण्यास मदत करते. अ‍ॅलोव्होराचा ज्यूसदेखील स्ट्रेच मार्क्सवर लावल्यास फायदा होऊ शकतो. हे लावल्यानंतर कोमट पाण्याने त्वचा धूऊन टाकावी.
लिंबू...

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी लिंबू वापणेही फायद्याचे ठरते. लिंबामध्ये नैसर्गिक ऍसिड मोठ्या प्रमाणात. असल्यामुळॆ स्ट्रेच मार्क्स, एक्ने आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो. ताज्या कापलेल्या लिंबाच्या रस सर्कुलर मोशनमध्ये स्ट्रेच मार्क्सवर लावावा.

हा लिंबाचा रस कमीत कमी दहा मिनिटे लाऊन ठेवावा. दहा मिनिटांनतर त्वचा धूऊन टाकावी. खीरे आणि लिंबाचा रस एकत्र करून स्ट्रेच मार्क्सवर लावल्यासही फायदा होण्यास मदत होते. 


ऑलिव्ह ऑईल... 


ऑलिव्ह ऑइल स्ट्रेच मार्क्सवर लाऊन हलक्या हाताने मालिश करावी. हे तेल त्वचेवर सधारण अर्धातास ठेवावे. यामध्ये असलेले व्हिटामिन ए, डी आणि ई त्वचा शोषून घेते. हे तेल लावल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे स्ट्रेच मार्क्स हलके होण्यास मदत होते.


साखर...

साखर ही स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी उत्तम आहे. साखर शरिरावरील मृत त्वचा काढून टाकण्याचे काम करते. बदामच्या तेलात एक चमचा साखर टाकून त्यामध्ये लिंबाचे काही थेंब टाकून चांगले एकत्र करावे. एकत्र झालेले हे मिश्रण स्ट्रेच मार्क्स झालेल्या जागेवर लावावे. अंघोळीच्या आधी दहा मिनिटे रोज लावल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.

बटाटा...

बटाट्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. यामुळे त्वचेची वाढ होते आणि त्याची काळजी देखील घेतली जाते. मोठ्या आकारात बटाटा कापून स्ट्रेच मर्क्स झालेल्या जागेवर लावावा आणि काही मिनिटांनी कोमट पाण्याने बटाटा लावलेली त्वचा धूऊन टाकावी.


वर्कआउट...

वर्कआउट केल्याने देखील स्‍ट्रेच मार्क्स बरे होण्यास मदत होते. वर्कआउट केल्याने मसल्‍स ताकदवान होण्यास मदत होते.

योग्य आहार....


आहारात व्हिटॅमिन सी आणि ई असणारे फळ आणि भाज्यांचा सामावेश मोठ्या प्रमाणात करावा. यामुळे शरिरातील टिशूंची वाढ होण्यास मदत होते आणि खराब टिशू बरे होतात.


थोडे नवीन जरा जुने