विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच "या"ही गोष्टीकडे लक्ष द्या
अभ्यासासोबत दररोज व्यायाम करणे शक्य होईल असे नाही. व्यायामासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फिटनेससाठी घाई करू नये.

शरीरयष्टी कमावण्याची सर्वात जास्त क्रेझ कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये असते. शरीर कमावण्यासाठी मुले सातत्याने व्यायाम करतात, पण अभ्यासाचा तणाव आणि व्यायामाचे नियमित वेळापत्रक सांभाळणे कठीण होते. यामुळे तणाव वाढण्याचा धोका जास्त असतो.

अभ्यास, क्लासेस यांच्या वेळापत्रकानुसार नियमितपणे व्यायाम करण्यात चुकीचे काही नाही, परंतु हे वेळापत्रक पाळताना मानसिक आणि शारीरिक तणाव घेणे योग्य नाही.


दिनचर्येप्रमाणे आपल्या व्यायामाचे वेळापत्रक ठरवावे. कोणत्याही परिस्थितीत नियमित व्यायाम केलाच पाहिजे असे काही बंधन नसते. तुम्हाला हवे असल्यात फक्त रविवारी घरी किंवा मैदानावर व्यायाम करू शकता.


आपल्याला जे काम आवडते तेच करा. यामुळे तुम्हाला जास्त आनंद मिळेल.


पोषक आहाराकडे मात्र दुर्लक्ष करू नका. कारण याचा तुमच्या अभ्यासावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.


निरस आहार, जंक फूड किंवा कोल्ड्रिंक्सचे पथ्य पाळले पाहिजे. कारण या पदार्थांमुळे शरीरातील पोषक तत्त्वे शोषण्यात अडथळा निर्माण होतो.


थोडे नवीन जरा जुने