संधिवाताच्या त्रासाने त्रस्त आहात ? मग हे करा




भोजन पद्धतीत बदल करून अर्थरायटीसचे (संधिवात) रुग्ण आपला त्रास कमी करू शकतात. तज्ज्ञांच्या मते, खाद्यपदार्थांमुळे संधिवात मुळापासून नष्ट्र केला जाऊ शकत नाही; परंतु स्थितीत ब-यापैकी सुधारणा आणली जाऊ शकते. या खाद्यपदार्थांबाबत अधिक जाणून घेऊया.
संधिवाताने पीडित असल्यास सांधेदुखी, हाडांमधून आवाज येणे आणि वजन अनियंत्रित होणे यासारख्या तक्रारी दूर करण्यासाठी योग्य खान-पान खूप गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते पीडिताने सांधे आणि हाडांना मजबुती प्रदान करणा-या खाद्यपदार्थांचा समावेश जेवणामध्ये विशेषत्त्वाने केला पाहिजे. जाणून घेऊया अशाच काही खाद्यपदार्थांच्या बाबतीत...

ऑलिव्ह ऑइल -

एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेला ओलिओकेंथेल नावाचा घटक सूज येण्यासाठी जबाबदार असलेल्या एंझाइम्सला ब्लॉक करण्यास साहाय्यक ठरतो. फिलाडेल्फिया येथील मोनेले केमिकल सेंसेज सेंटरच्या एका संशोधनानुसार, जेवणात तीन चमचे ऑलिव्ह ऑइलचा वापर ब्रुफेमच्या एक दशांश भागाच्या समान काम करते.

तज्ज्ञांच्या मते ऑलिव्ह ऑइल कॅलरी फ्री (एका चमचात 119 कॅलरी असते) नसते, परंतु मर्यादित प्रमाणात याचे सेवन केले जाऊ शकते. एक चमचा ऑलिव्ह ऑइल सॅलड किंवा भाजीमध्ये वापरणे फायदेशीर आहे.

‘क’ जीवनसत्त्व - शिमला मिरची आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांमध्ये भरपूर असलेले ‘क’ जीवनसत्त्व कोलेजनला सुरक्षित ठेवण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते जेवणात या जीवनसत्त्वाचा अभाव असल्यास संधिवात पीडिताचा त्रास आणखी वाढू शकतो.

कॅनडा येथे संधिवात असलेल्या 1317 पुरुषांवर एक संशोधन करण्यात आले. त्यामध्ये जे लोक जेवणात 1500 मिलीग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व दररोज समाविष्ट्र करतात त्यांचा त्रास 45 टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे या संशोधनातून आढळून आले. तसेच जे लोक पुरेसे ‘क’ जीवनसत्त्व घेत नाहीत त्यांना जास्त त्रासाचा सामना करावा लागतो. 200-500 मिलीग्रॅम ‘क’ जीवनसत्त्वाने सुरुवात करा. एक संत्रा व एक कप स्ट्रॉबेरीचे सेवन करा.

कांदा -

कांद्यात असलेल्या क्यूर्सेटिन नावाच्या अँटिऑक्सिडंटमुळे सूज वाढवणा-या रसायनाची सक्रियता बाधित होते. हेच काम अ‍ॅस्प्रिन आणि ब्रुफेम यासारखे औषधही करतात. तज्ज्ञांच्या मते कांद्याच्या सेवनाने संधिवाताच्या रुग्णांना दिलासा मिळतो. याउलट जे लोक तोंडातून दुर्गंधी येण्याच्या भीतीने कांद्याचे सेवन करत नाहीत त्यांनी टोमॅटो किंवा सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. सॅलडच्या रूपात कांद्याचे सेवन करता येईल किंवा भाजी बनवताना त्यात कांदा टाकावा.

मासे -

माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड भरपूर आढळते. हे अ‍ॅसिड सूज वाढवणा-या रसायनांना बाधित करते. तसेच माशांमध्ये असलेल्या ‘ड’ जीवनसत्त्वामुळे सुद्धा सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. जेवणात एक ग्रॅम ओमेगा-3 आवश्यक आहे. तसेच 2.27 ग्रॅम अक्रोडचे सेवनही करता येईल.
थोडे नवीन जरा जुने