थायरॉइडच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे वाचाथायरॉइडला सायलेंट डिसीज म्हटले जाते, कारण याचे सुरुवातीचे लक्षण सामान्य असतात जे लवकर लक्षात येत नाहीत. थायरॉइड नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर आपल्याला व्यायाम किंवा शारीरिक श्रम करण्याचा सल्ला देतात. आज आम्ही तुम्हाला थायरॉइड आजारापासून दूर राहण्यासाठी एक खास योगासनाची माहिती देत आहोत. या आसनाचे नाव सर्वांगासन असे आहे.

कृती -
जमिनीवर अंथरलेल्या आसनावर शांत चित्त होऊन झोपा. श्वास बाहेर सोडून दोन्ही पाय सरळ आणि एकमेकांना चिटकलेल्या स्थितीत वर उचला. नंतर पाठीचा भागही वर उचला. दोन्ही हातांनी कंबरेला आधार द्या. हाताचे कोपरे जमिनीला चिकटलेले असावेत. मान आणि खांद्याच्या बळावर संपूर्ण शरीर वर सरळ ताठ उचला. हनुवटी छातीस लावलेली असावी. दोन्ही पाय आकाशाकडे असावेत. दृष्टी दोन्ही पायांच्या अंगठ्यावर किंवा डोळे मिटून सामान्य श्वासोश्वास चालू ठेवावा.

प्रारंभी तीन ते पाच मिनिटे हे आसन करावे. या आसनाचा अभ्यास दृढ झाल्यानंतर दोन्ही पायांना पुढे मागे झुकवत, जमिनीला लावून अन्य आसनेसुद्धा करू शकता.

लाभ -
या आसनाने थायरॉइड नावाच्या अंतःग्रंथीची शक्ती वाढते. तेथे रक्तसंचार तीव्र गतीने होऊ लागतो. ज्यामुळे त्यास पोषण मिळते. थायरॉइडच्या रुग्णास या आसनानाने अद्भुत लाभ होतो. सर्वांगासनाच्या अभ्यासाने सुरकुत्या पडणे बंद होते. अंग कांतीमय होते. केस पांढरे होऊन गळत नाहीत.

थोडे नवीन जरा जुने