या लहान-मोठ्या आजारांनी त्रस्त आहात ? उपाय तुमच्याच घरात वाचा
शरीरात कोणत्याही प्रकारचा लहान-मोठा त्रास होत असल्यास बरेच लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधुन औषध आणून घेतो.

अशाप्रकारे डॉक्टरांचा सल्ला न घेत औषधांचे सेवन केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अशा लहान-मोठ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काही परंपरागत घरगुती उपाय करू शकता.

तुम्हीही सतत लहान-मोठ्या आजारांनी त्रस्त असाल तर पुढे दिलेले काही घरगुती उपाय अवश्य करून पाहा...

जखमेचे वण मिटतील

खोल जखमेमुळे शरीरावर पडणारे डाग कमी करण्यासाठी त्या जागेवर कच्चे बटाटे वाटून लावावे. असे काही दिवस केल्याने डाग नाहीसे होतात.


कफ होईल कमी
जवसाचे दाणे मंद आचेवर भाजून घ्या. यात खडीसाखर मिसळून चांगले वाटून घ्यावे. ही पावडर गरम पाण्यासोबत पिल्याने कफचा त्रास कमी होतो.


होणार नाही मुरमे

30 ग्रॅम चिंच एक ग्लास पाण्यात मिसळावी. चिंचेचे आणि पाण्याचे चांगल्या पद्धतीने मिर्शण करावे. चिंचेचा हा रस पिल्याने चेहर्‍यावरील मुरमे, फोड लवकर बरे होतील.


त्वचेचा रंग उजळेल
मटारचे दाणे भाजून घ्या.
यात चंदन पावडर आणि थोडेसे दूध मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट आठवड्यातून तीन दिवस लावल्यास त्वचेचा रंग उजळेल.


त्वचेला फायदा :

दोन केळी कुस्करून त्यात दोन चमचे मध टाका. ही पेस्ट रूक्ष त्वचेवर लावल्यास त्वचेचा रूक्षपणा कमी होतो.


आराम मिळेल :

दोन चमचे आवळ्याची पावडर घ्या. त्यात एक चमचा मध मिसळा. या पेस्टचे दररोज सकाळ- संध्याकाळ सेवन केल्याने श्वासाचा त्रास कमी होईल.


कोंडा जाईल :
चार चमचे खोबरेल तेल गरम करा. त्यात एक कापूर वडी टाकून चांगले मिसळून घ्या आणि डोक्यावर लावा. यामुळे डोक्यातील कोंडा कमी होईल.


रक्तदाब घटेल
दररोज सकाळी तुळशीची पाच पाने आणि लिंबाची दोन पाने चावून खाल्ल्याने उच्च् रक्तदाब असणार्‍या व्यक्तींना आराम मिळतो.


रक्त होईल स्वच्छ

आवळ्याचा आंबट किंवा गोड मुरब्बा तयार करून घ्या. हा मुरब्बा दररोज सकाळी पाण्यासोबत घ्यावा रक्त स्वच्छ होईल.


आराम मिळेल

एक चमचा मेथी दाणे चिमूटभर हिंगात मिसळून पाण्यासोबत खाल्ल्याने वारंवार होणार्‍या पोटदुखीवेळी आराम मिळतो.
डाग नाहीशे होतील :
हवळीचे दाणे वाटून यात गायीचे तूप मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहर्‍यावरील पांढर्‍या डागांवर लावावी. डाग कमी होतील.


दुखण्यात मिळेल आराम:

अरबी वाटून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट मधमाशी चावलेल्या ठिकाणी लावावी. दुखणे आणि सूज दोन्ही कमी होते.


उपयुक्त ओवा :
चार चमचे ओव्याला एक ग्लास पाण्यात 20 मिनिटे मंद आचेवर उकळा. थंड करून हे पाणी पिल्याने पोटातील आजारात आराम मिळतो.
रक्तदाब सामान्य :

रक्तदाब सामान्य राहण्यासाठी सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या पाण्यासोबत चावून खाव्यात. आठवड्यात तीन वेळा असे करावे


अँसिडिटी कमी होईल

दहा ग्रॅम नारळाचा कीस, खसखस आणि चंदन अर्धा ग्लास पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्यावे. अँसिडिटी कमी होते.


कोलेस्टेरॉल कमी

रात्री मोठे धणे पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी सकाळी उठून प्यावे. धणे चावून खावे असे केल्याने कोलेस्टेरॉल पातळी कमी होते.


खोकल्यात आराम:

खोकला लागल्यास खाऊच्या पानात ओवा टाकून चावावे. दोन ते तीन दिवस असे केल्याने खोकला बरा होतो.


बदामातून मिळेल फायदा:

तुम्हाला अल्सरचा त्रास होत असल्यास बदाम वाटून ठेवावे. सकाळ-संध्याकाळ दुधात मिसळून पिल्याने अल्सर बरा होतो.


रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी:

दररोज सकाळी रिकाम्यापोटी दोन पाकळ्या लसूण खाल्ल्याने उच्च् रक्तदाब कमी होतो. तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो.


मुतखड्याचा त्रास होणार नाही:
मुतखड्याचा त्रास होत असेल तर कांद्याच्या रसात साखर मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे मुतखडा तुटून नैसर्गिकरीत्या बाहेर पडेल.


त्वचारोगावर रामबाण:
कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगामध्ये लवंग वाटून चंदनासोबत त्याचा लेप तयार करा. हा लेप लावल्याने त्वचा निरोगी राहते.


अतिसार झाल्यास हे करा:
अतिसार झाल्यावर भात खावा. भात आतड्यांचा वेग कमी करून जुलाब थांबवतो. त्यामुळे भाताचे सेवन के ल्यास तुम्हाला नक्की आराम मिळेल.


थोडे नवीन जरा जुने