वारंवार होणारी डोकेदुखी या आजाराची असु शकतात लक्षणे
सातत्याने होणार्‍या डोकेदुखीकडे लक्ष न दिल्यास हे धोकादायक ठरू शकते. वारंवार होणारी डोकेदुखी हे मायग्रेनचे (अर्धशिशी) लक्षण असू शकते. काही लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास या आजारापासून बचाव करता येतो. या लक्षणांकडे काळजीपूर्वक पाहत काही सावधगिरी बाळगली तर मायग्रेनची समस्या नियंत्रणात ठेवता येते.


कसे ओळखावे
बहुतांश प्रकरणात मायग्रेन लहानपणापासूनच व्यक्तीला त्रास देणे सुरू करतो. काही प्रकरणात युवा अवस्थेत ही समस्या डोके वर काढते. याच्या चार अवस्था असतात. कोणत्याही व्यक्तीला या चार अवस्थेपैकी एका अवस्थेचा सामना करावा लागतो. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे मायग्रेनचा अंदाज घेता येतो.
लक्षणांची नोंद
वारंवार डोकेदुखीने होणार्‍या दुखण्याच्या लक्षणांची नोंद करावी. असे केल्याने तुम्हाला मायग्रेनचाच त्रास आहे की नाही हे जाणून घेता येईल. नोंदीमुळे नेमका कोणता भाग दुखतो , काय त्रास होतो हे कळते.


पालकांना विचारा
कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास होता किंवा आहे काय हे पालकांना विचारा. जर असे असेल तर मायग्रेनचा धोका वाढतो.


कोणाला जास्त धोकाज्याच्या घरात कोणाला मायग्रेनचा त्रास असेल त्यांना या आजाराचा जास्त धोका असतो. त्याचप्रमाणे वयाच्या 40 व्या वर्षांनंतर अनेकांना मायग्रेनचा अटॅक येणे सुरू होते.


काय असू शकतात कारणे ?

मायग्रेनच्या मागे अनुवांशिक कारणांसोबत काही नैसर्गिक अवस्था देखील जबाबदार आहेत. याशिवाय मेंदूमध्ये आढळणारा सेरोटोनिन घटक देखील मायग्रेनसाठी जबाबदार असतो. यामुळे डोके दुखण्याचे प्रमाण वाढते.


दुखणे का वाढते ?

मायग्रेनचे दुखणे वाढण्यामागे काही महत्त्वपूर्ण कारणे देखील आहेत. अनियमित भोजन, तणाव, झोपणे-उठण्यातील कालावधी, वातावरणात अचानक झालेला बदल आणि अधिक प्रमाणात औषध घेणे या कारणांचा समावेश आहे.


कसा करावा बचाव

दररोजच्या आहारात पचनास हलक्या आहाराचा समावेश करावा. त्याचप्रमाणे कमीत कमी सात तास झोप घेणे आवश्यक आहे. दररोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करावा. तसेच योगा देखील करू शकता. आठवड्यातून तीन ते चार ध्यानधारणा करावी असे केल्याने मेंदूला आराम मिळतो आणि मायग्रेनचा सामना करण्यास मदत मिळते.थोडे नवीन जरा जुने