लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी जेवताना 'या' साध्या गोष्टीकडे लक्ष द्यासध्याच्या काळात आपल्या दिनचर्येत विविध बदल झाले आहेत. या बदलांचा प्रभाव सरळ आपल्या आरोग्यावर पडतो. आजच्या जिवनपद्धतीमध्ये लठ्ठपणा ही एक मुख्य समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात, परंतु फार कमी लोकांना लठ्ठपणा दूर करण्यात यश मिळते.
लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी योग, व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्राचीन काळापासून अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी विविध प्रथा तयार करण्यात आल्या आहेत. जे लोक या प्रथांचे पालन करतात त्यांना आरोग्याशी संबंधित लाभासोबतच धर्म लाभ होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या जेवतांना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास लठ्ठपणाची समस्या आणि पोटाशी संबंधित छोटे-छोटे आजार दूर होतील..

जमिनीवर बसून जेवण करावे
प्राचीन प्रथेनुसार आपण जमिनीवर बसून जेवण केले पाहिजे, परंतु आज या प्रथेचे पालन फार कमी लोक करतात. भौतिक सुख-सुविधांच्या हव्यासापोटी मनुष्याने प्राचीन प्रथांकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक लोक जीवन स्तर उच्च ठेवण्यासाठी आणि दाखवण्यासाठी टेबल-खुर्चीवर बसून जेवण करतात. प्राचीन काळात राजे-महाराजेसुद्धा जमिनीवर बसून जेवण करीत होते. जमिनीवर बसून जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.

जमिनीवर जेवण करण्यसाठी बसल्यानंतर आपण एका विशेष योगासनाच्या स्थितीमध्ये बसतो. या आसनाला सुखासन म्हणतात. सुखासन हे पद्मासनाचे एक रूप आहे. सुखासनात बसून जेवल्याने शरीराच्या अवयवांची योग्य नैसर्गिक स्थिती असल्याने अन्नाचे पचन योग्यप्रकारे होते. टेबल-खुर्चीवर बसून जेवल्याने शरीराच्या अवयवांची नैसर्गिक स्थिती योग्य नसल्याने अन्नाचे पचन योग्यप्रकारे होत नाही त्यामुळे अपचन, गॅस, लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते.


सुखासनात बसून जेवण केल्याने कोणकोणते लाभ होतात....

सुखासनात बसल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे अन्नपचनात मदत मिळते. प्राणवायुला गती मिळते. यकृत व आमाशय दोघांचे कार्य सुलभरीत्या होते.
सुखासनात बसून जेवल्याने पाचनतंत्र व्यवस्थित राहते. मंदाग्नी, अपचन, वातप्रकोप, गॅस, लठ्ठपणा, यासारखे अनेकानेक पोटाचे आजार दूर होतात. नेहमी या आसनात बसून जेवण केल्यास कोणत्याही व्यक्तीला निश्चितच आरोग्यदायी लाभ होईल.

जर एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी बसून जेवण्यास मनाई केली असेल तर अशा पद्धतीने जेवण करण्यासाठी बसू नये.


अशा पद्धतीने जेवण केल्यास देवी-देवतांची कृपा प्राप्त होते...
शास्त्रानुसार जर आपण अशा प्रकारे शांती आणि पारंपारिक पद्धतीने जेवण केले तर देवी-देवतांची कृपा प्राप्त होते, अन्न देवता तृप्त होतात. अशा पद्धतीने जेवण केल्यास शरीराला जास्तीत जास्त प्रमाणात सकारात्मक उर्जा मिळते. जेवण केल्यानंतर आळस येत नाही. जेवतांना भूक असेल तेवढेच अन्न ग्रहण करावे. आवश्यकतेपेक्षा जास्त जेवण केल्यास आळस, लठ्ठपणा वाढतो.

पुढे जाणून घ्या, महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये अन्नासंबंधीचे काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास शरीराचे पावित्र्य चांगले राहते तसेच आरोग्यही उत्तम राहते.
महाभारतातील अनुशासन पर्वानुसार एखाद्या व्यक्तीने अन्न ओलांडले तर ते अन्न खाऊ नये. असे जेवण अपवित्र आणि राक्षसांचा आहार बनते.
जे अन्न भांडण, वाद-विवाद करून मिळवलेले असेल, असे अन्न खाऊ नये.
- अन्नावर एखाद्या रजस्वला स्त्रीची सावली पडली असेल तर ते अन्न दुषित होते. असे अन्न खाऊ नये.
जर अन्नाला कुत्र्याने स्पर्श केला असेल किंवा त्याकडे त्याची नजर गेली असेल तर असे अन्न अपवित्र होते.
जेवणामध्ये केस निघाल्यास असे जेवणही अपवित्र होते. असे अन्न खाऊ नये.


जर जेवणामध्ये किडे पडले तर असे जेवण अशुद्ध होते.असे जेवण जेवल्यास आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते.
जर जेवण एखाद्या व्यक्तीच्या शिंकेमुळे किंवा आश्रुमुळे दुषित झाले तर असे अन्न खाऊ नये.

जर एखाद्या दुराचारी व्यक्तीने आपल्या जेवणामधील अन्न खाल्ले तर ते जेवण करू नये.

जेवण देव, पितर, अतिथी आणि लहान मुलांना दिल्याशिवाय करू नये.


थोडे नवीन जरा जुने