लेन्सचा वापर करणार्‍यांनी अशी घ्या काळजीडोळे अमूल्य आहेत, यांच्या मदतीने तुम्ही सगळे जग पाहू शकता. म्हणून काँटॅक्ट लेन्सचा वापर करणार्‍यांनी काही सावधगिरी बाळगली पाहिजे.
या गोष्टींची काळजी घ्या
असे काढावे - लावावे : 

काँटॅक्ट लेन्स लावणे आणि काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. असे केल्याने लेन्स दूषित होण्याची भीती राहत नाही. तसेच ते काढताना नखांनी पकडू नयेत. यामुळे लेन्सवर स्क्रॅचेस येण्याची शक्यता असते. नखांमुळे डोळ्याच्या बुबळांनादेखील इजा होऊ शकते.

अशा ठेवा सुरक्षित :
लेन्सला सोल्युशनमध्ये पूर्णपणे बुडवून ठेवावे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही क्लीनर प्रॉडक्ट वापरू नये. कॉस्मेटिक लोशन, क्रीम किंवा स्प्रेच्या संपर्कात येऊ देऊ नका. लेन्स स्वच्छ केल्यानंतर ओले ठेवू नका. कारण आद्र्रतेमुळे जंतू वाढण्याचा धोका राहतो.

अशा वेळी लावू नका :
पोहताना, झोपताना, गाडी चालवताना, जोरदार वारे वाहत असताना काँटॅक्ट लेन्सचा वापर करू नये. गाडी चालवताना किंवा जोरदार वारे असताना डोळ्यात धूळ जाते. परिणामी, लेन्सवर ओरखडे पडू शकतात. तसेच लेन्स लगेच खराब होण्याचा धोका असतो.

वेळेवर बदलावे :
डॉक्टरांनी सल्ला दिल्याशिवाय लेन्सचा वापर करू नका. तसेच जोपर्यंत लेन्स लावण्याचा सल्ला दिला आहे, तोपर्यंतच त्या लावाव्यात. दिलेल्या काळानंतर याचा वापर केल्यास डोळ्यांना नुकसान होऊ शकते. लेन्सची केसदेखील तीन महिन्यांनंतर बदलली पाहिजे. याला दररोज स्वच्छ करावे आणि वाळत ठेवावे.

लावताना सावधगिरी बाळगा : काँटॅक्ट लेन्स खुर्ची किंवा स्टूलवर बसून पायावर टॉवेल, मोठे कापड टाकून मगच लावल्या पाहिजेत. जर लेन्स खाली पडली, तरी ती या कपड्यावर पडेल. बेडवर बसून लेन्स लावणे योग्य राहील.

झोपताना लेन्स काढून ठेवाव्यात
जेव्हा आपण जागे असतो, तेव्हा आपले डोळे वातावरणातून ऑक्सिजन घेतात. तर झोपताना डोळे पापण्यांच्या पेशीतून ऑक्सिजन घेतात, पण काँटॅक्ट लेन्सचा वापर करताना आपले डोळे बंद झाल्यास ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. म्हणून झोपताना याचा वापर करणे धोकादायक ठरते. यातून प्रामुख्याने दोन समस्या उद्भवू शकतात.

एकंथामिबा इन्फेक्शन :
काँटॅक्ट लेन्स काढल्यानंतर जर डोकेदुखी, डोळे दुखणे आणि खाज होत असेल, तर ही लक्षणे एकंथामिबा संसर्गाची असू शकतात. अशा स्थितीत लेन्सचा वापर लगेच बंद करावा. नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. हा संसर्ग शरीराच्या इतर भागात पसरून त्यांना प्रभावित करू शकतो.

बॅक्टेरियल केराटाइटिस :

काँटॅक्ट लेन्स दररोज स्वच्छ केल्या पाहिजेत. काँटॅक्ट लेन्सची स्वच्छता न झाल्यास कॉर्नियाच्या संसर्गातून सूक्ष्मजीव डोळ्यात प्रवेश करतात. अशा स्थितीत डोळ्यांना गंभीर संसर्ग होण्याचा धोका असतो. सूक्ष्मजीवांचा हल्ला कॉर्नियावर झाला, तर ते धोकादायक असते.


किती प्रकारच्या काँटेक्ट लेन्स ?

सॉफ्ट लेन्स :
ही जेलीप्रमाणे मऊ असते. याच्या मटेरियलमध्ये पाणी असते. त्यातून कॉर्नियाला ऑक्सिजन मिळते. सॉफ्ट लेन्समध्ये डिस्पोजेबल लेन्स जास्त सुरक्षित मानली जाते.
त्रुटी :
अनेक दिवस याचा वापर केल्याने डोळ्यात प्रोटीन जमा होऊ लागतो. त्यामुळे लेन्स धुरकट होऊ लागतात आणि त्यांना लगेच बदलावे लागते.

सेमी सॉफ्ट लेन्स :

हे कॉर्नियापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यात मदत करतात. याला सवरेत्तम लेन्स म्हटले जाते. खासकरून सिलिंड्रिकल नंबर असणार्‍यांसाठी. इतर लेन्सच्या तुलनेत याची देखभाल अत्यंत सोपी असते.
त्रुटी : हे जास्त टिकाऊ आहे, म्हणून लोक दीर्घकाळापर्यंत याचा वापर करतात, पण लेन्स कितीही टिकाऊ असो, वर्षाच्या आत बदलल्या पाहिजेत.

हार्ड लेन्स :
कठीण काँटॅक्ट लेन्स हलक्या आणि जास्त टिकाऊ असतात. म्हणून याचा दीर्घकाळासाठी वापर केला जाऊ शकतो. तरी सध्या याचा वापर करण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण कठीण असल्यामुळे याच्या वापराचे अनेक धोके आहेत. याच्या वापराने कॉर्नियाला ओरखडा येण्याचा धोका असतो.
त्रुटी : यातून ऑक्सिजन आरपार जाऊ शकत नाही. परिणामी, कॉर्नियाचे नुकसान होते. रात्री झोपताना कोणत्याही परिस्थितीत काढावे लागतात.

डिस्पोजेबल लेन्स :

या लेन्स वापरल्यानंतर फेकून द्याव्या लागतात. ज्यांच्या डोळ्यात संसर्ग असतो, त्यांच्यासाठी या अत्यंत उपयोगी आहेत. लोक रंगीत लेन्सदेखील डिस्पोजेबलच घेणे पसंत करतात.

त्रुटी : एक वेळ वापरल्यानंतर जास्त खर्च होतो. दररोज वेगळी लेन्स वापरावी लागत असल्याने एकाच वेळी अनेक लेन्स खरेदी कराव्या लागतात.


थोडे नवीन जरा जुने