रोज झोपताना एक चमचा तूप आणि अश्वगंधा चूर्ण कोमट दुधात टाकून घ्या आणि परिणाम बघा
लठ्ठपणाप्रमाणेच दुबळेपणा अनेकवेळा अडचणींचे कारण ठरतो. सामान्यतः ज्या लोकांना भूक लागत नाही त्यांना ही समस्या होते. भूक कमी लागल्यामुळे जेवण ग्रहण करण्याची क्षमताही कमी होते.

यामुळे शरीरातील धातूंचे पोषण होत नाही. अशा स्थितीमध्ये शरीर दुबळे होते. तुम्हीही दुबळेपणामुळे त्रस्त असाल तर येथे सांगण्यात आलेले उपाय करून पाहा...या उपायांनी दुबळेपणाची समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकते...

1. दुबळेपणाच्या रुग्णांनी डायझेशनकडे लक्ष देत दुध, दही, तूप इ. पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन करावे. दुबळेपणामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तीने तणाव, जास्त सेक्स आणि व्यायाम पूर्णपणे बंद करावा.
2. भरपूर झोप घ्यावी. गव्हाची पोळी, मुग किंवा तुरीची डाळ, पालक, पपई, भोपळा, मेथी, पडवळ, पत्ताकोबी, फुलकोबी अशा पदार्थांचे जास्त सेवन करू नये.


3. दररोज सफरचंद, डाळिंब, मोसंबी इ. फळांचा रस घ्यावा तसेच सुकामेवा, अंजीर, बदाम, काजू, मनुका यांचे सेवन भरपूर प्रमाणात करावे.


4. झोपताना एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा शुद्ध तूप टाकून घ्यावे. तसेच यामध्ये एक चमचा अश्वगंधा चूर्ण टाकल्यास लवकर लाभ होईल.


5. लवणभास्कर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, अग्निकुमार रस, आनंदभैरव रस, लोकनाथ रस, द्राक्षासव, लोहासव, भृंगराजासन, द्राक्षारिष्ट, अश्वगंधारिष्ट, सप्तामृत लौह, नवायस मंडूर, आरोग्यवर्धिनी वटी, च्यवनप्राश, बादाम पाक, अश्वगंधा पाक, शतावरी पाक, लोहभस्म, शंखभस्म, स्वर्णभस्म, इ. आयुर्वेदिक औषधांचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता.
थोडे नवीन जरा जुने