दररोज खा फक्त चिमुटभर फुटाणे मिळावा हे फायदेदररोज ५० ग्रॅम फुटाणे खाणे शरीरासाठी खूप लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार फुटाणे आणि हरभर्‍याची डाळ शरीरासाठी पौष्टिक आहे. फुटाणे खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.
फुटाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जाते. कारण हे स्वस्त असूनही यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. याच्या नियमित सेवनाने सौंदर्य खुलते तसेच स्मरणशक्ती वाढते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज नाष्ट्यामध्ये फुटाण्यांचा समावेश करावा. गर्भवतीला उलट्या होत असतील तर भाजलेल्या फुटण्याचे सूप पाजावे.
हरभर्‍याच्या पिठाचा हलवा थोडे दिवस नियमित खाल्यास वातामुळे निर्माण होणार्‍या आजारांमध्ये तसेच दम्याच्या त्रासामध्ये आराम मिळेल.


रात्री हरभर्‍याची डाळ भिजवून ठेवा. सकाळी ही डाळ बारीक वाटून घ्यावी आणि साखरेच्या पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे मानसिक तणाव कमी होईल. ५० ग्रॅम फुटाणे उकळून घ्या आणि त्याच उकळलेल्या पाण्यामध्ये बारीक करा. हे कोमात पाणी एक महिनाभर पिल्यास जलोदर रोग दूर होईल.


जलोदर रोगाची लक्षणे
पोट फुगणे

श्वास घेण्यास त्रास होणे
पाय सुजणे


हरभर्‍याच्या पिठाच्या मीठ न घालता केलेल्या पोळीचे ४० ते ६० दिवस सेवन केल्यास त्वचेशी संबंधित आजार दूर होतील. भाजलेले फुटाणे रात्री चावून खावेत आणि त्यानंतर गरम दुध प्यावे. या उपायाने श्वासानाशी संबधित रोग तसेच कफ दूर होतो.


सरासरी १00 ग्रॅम फुटाण्यांमध्ये २२.५ ग्रॅम प्रोटिन्स, ५.२ ग्रॅम फॅट, १ ग्रॅम फायबर (तंतूमय पदार्थ) आणि ९.५. ग्रॅम लोह असते. मधुमेही रुग्णाने दररोज सकाळ व सायंकाळी ५0 ग्रॅम फुटाणे खाल्ले तर तीन दिवसात त्याच्या इन्सुलिनची मात्रा २0 टक्क्याने कमी होते.


कावीळ झाला असेल तर १०० ग्रॅम हरभर्‍याची डाळ दोन ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर डाळ पाण्यातून काढून त्यामध्ये १०० ग्रॅम गुळ मिसळून ४-५ दिवस या मिश्रणाचे सेवन केल्यास कावीळ बरा होण्यास मदत होईल.


मातीच्या भांड्यामध्ये रात्री फुटाणे भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर भिजवलेले फुटाणे चावून-चावून खा. या उपायाने विर्‍यामध्ये वृद्धी होईल तसेच पुरुषाच्या कमजोरीशी संबंधित समस्या समाप्त होतील. भिजवलेले फुटाणे खाल्ल्यानंतर त्यावर दूध पिल्यास वीर्‍यातील पातळपणा दूर होईल.


गुळ आणि फुटाण्याचे नियमित सेवन केल्यास मुत्ररोगाशी संबधित समस्या समाप्त होतात. दररोज भाजलेले फुटाणे खाल्या मुळव्याधीचा त्रास कमी होईल.


थोडे नवीन जरा जुने