कोथिंबिरीचे हे आहेत आरोग्यदायी फायदे या समस्या होतील दूर
प्राचीन काळापासून कोथिंबीरीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी करण्यात येत आहे. कोथिंबीर केवळ अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी उपयोगात येत नाही तर यामध्ये विविध औषधी गुण आहेत.

या वनस्पतीच्या पाल्याला कोथिंबीर व फळांना धणे म्हणतात. आज आम्ही तुम्हाला कोथिंबीरीमधील काही खास औषधी गुणांची माहिती देत आहेत.

कोथिंबिरीचे पानं खाल्ल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. यामध्ये अँटी फंगल, अँसेप्टिक, डिटॉक्सीफाइड गुण आढळून येतात. एखाद्या व्यक्तीला खाज व पुरळची समस्या असेल तर त्यांनी कोथिंबीरीची पेस्ट तयार करून त्वचेवर लावावी. या उपायाने लगेच आराम मिळेल.

पित्ताचा त्रास असल्यास कोथिंबीरीच्या पानांचा थोडासा रस सेवन केल्यास आराम मिळेल.

कोथिंबीरीच्या पानांमध्ये अँटी ट्युमेटिक आणि अँटी अर्थराइटिस गुण असतात. सूज कमी करण्यात कोथिंबीर उपयोगी ठरू शकते. कोथिंबीरीच्या सेवनाने सांधेदुखीमध्ये आराम मिळेल.

कोथिंबीरीमध्ये आयर्नचे भरपूर प्रमाण असल्यामुळे अ‍ॅनिमिया दूर करण्यात मदत होते. अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन ए, सी आणि विविध पोषक तत्वांनी भरपूर असलेली कोथिबिर कॅन्सरला दूर ठेवण्यास सक्षम आहे.

कोथिंबीरीची चटणी करून खाल्ली जाते, कारण यामुळे शांत झोप लागते. डायबिटीज रुग्णांसाठी ही वरदान आहे. यामुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेचा स्तर कमी करण्यात सहायक ठरते.


कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, अँटीऑक्सीडेंट आणि फॉस्फरससारखे तत्व आढळून येतात. यामुळे कमजोर दृष्टीसाठी कोथिंबीर एक उत्तम औषध आहे.

कोथिंबीरीचे पानं बारीक करून पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. गाळलेल्या पाण्याचे काही थेंब डोळ्यामध्ये टाकल्यास डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर होईल.


20 ग्रॅम कोथिंबीरीची पानं थोड्याशा कापुरमध्ये मिसळून बारीक करून घ्या. त्यानंतर त्यामधील रस काढून घ्या. नाकातून घोळाणा फुटत असेल तर या रसाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त येणे बंद होईल.

कोथिंबीरीच्या (धणे) सुगंधित तेलामध्ये सिटरोनेलोल तत्व आढळून येते, जे उत्तम प्रकारचे अँसेप्टिक आहे. यामुळे तोंड आल्यास किंवा तोंडामध्ये जखम झाल्यास हे तेल फायदेशीर ठरते.

अ‍ॅलर्जीमुळे होणार्‍या दाहावर कोथिंबीरीच्या पानांचा रस आणि लेप गुणकारी ठरतो.थोडे नवीन जरा जुने