हे आहेत जंकफूडचे हे दुष्परीणाम
जंक फूड खाल्ल्याने मधुमेह होतोच पण किडनीवरही परिणाम होऊ शकतो असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. लठ्ठपणा हे दुसऱ्या प्रकारचा म्हणजे टाईप टू प्रकारचा मधुमेह होण्याचे प्रमुख कारण आहे.

सध्या जगभरातच टाईप टू प्रकारच्या मधुमेहाची रूग्णांची वाढती संख्या हा इशाराच आहे . या दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहात शरीरात गरजेइतक्या पातळीत इन्शुलिन तयार होत नाही किंवा शरीर इन्शुलिनला दादच देत नाही.

त्यामुळे आहारातली साखर रक्तात जमा होते त्यामुळे शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा दूरगामी परिणाम झालेला दिसतो. विशेषतः मुत्रपिंड, ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे मुत्रपिंडाचे गंभीर विकार जडतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य आणि ठोस उपचार केल्यास मुत्रपिंडात पुन्हा साखर शोषली जाण्यापासून निर्बंध ठेवता येतील.

याचा अभ्यास करताना संशोधक मधुमेह आणि आहारातून लठ्ठपणा आलेल्या आणि इन्शुलिनला दाद न देणा-या प्राण्यांवर संशोधन करतात. ज्यांच्यामध्ये किडनीवर साखरेच्या किंवा लठ्ठपणाच्या प्रमाणाचा परिणाम होतो . टाईप टू मधुमेह असणा-या उंदरांमध्ये , साखरेचे वाहक तसेच नियमित प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांना दिसून आले पण अतिउष्मांक असलेला आहार आणि जंक फूड यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले.

पाश्चिमात्य आहार पद्धतीमध्ये प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा आणि अतिरिक्त उष्मांक असणा-या पदार्थांचा समावेश जास्त होत असल्याचे परदेशी डॉक्टर हवोवी चिचगेर सांगतात ते पुढे म्हणतात या आहाराचे अति सेवन आणि सार्वत्रिकपणे आढळणारा लठ्ठपणा यांचा परस्परसंबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे .

मुत्रपिंडात साखर जमा होण्याच्या प्रक्रियेत मधुमेहाच्या दोन्ही प्रकारामध्ये फरक असल्याचे निष्कर्ष निघाला आहे. पण उच्च उष्मांक असलेला आहार आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे मात्र टाईप टू प्रमाणेच फरक पडत असल्याचे दिसून आले आहे.

मधुमेहावरील नव्या उपचारांच्या वापराने किडनीत साखरेचे होणारे वहन थांबवल्यामुळे रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येत असल्याचे चिचगेर स्पष्ट करतात . मुत्रपिंडावर साखरेच्या पातळीवर आहाराचा काय परिणाम होतो आणि आहारात बदल करून मुत्रपिंडावर होणारे परिणामांपासून कसे संरक्षण करू शकू समजून घेतले पाहिजे.


थोडे नवीन जरा जुने