हे खाद्यपदार्थ फॅट बर्न करण्यासाठी मदत करतीललठ्ठपणामध्ये फॅट बर्न करणे अतिशय कठीण काम आहे. यासाठी डाएटमध्ये फेरबदल आणि खूप एक्झरसाइज करावी लागते. वास्तविक, काही खाद्यपदार्थ असेही आहेत ज्यामध्ये फॅट बर्न करण्याची ताकद असते. अशा पदार्थांवर एक नजर टाकूया.
दालचिनी :
जेवणाचा स्वादिष्टपणा वाढवण्याखेरीज दालचिनी फॅट कमी करण्याचे कामदेखील करते. एक चतुर्थांश ते एक चमचापर्यंत आपल्या जेवणात वापर केल्याने याचा परिणाम जाणवू लागतो.
ग्रीन टी :
कॅफिन हार्ट रेट वाढवण्यासोबतच शरीराच्या सिस्टिमला कॅलरीज वेगाने बर्न करण्यासाठी मजबूर करते. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स असते. विशेषज्ञ मानतात की, हे तत्त्व बेली फॅट वेगाने बर्न करते.


दही :
एका संशोधनानुसार दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे फ्रेंडली बॅक्टेरिया आढळतात. जे शरीराला जास्त प्रमाणात फॅट अँब्सॉर्ब करण्यापासून थांबवते. हा गुण प्रत्येक प्रकारच्या दह्यामध्ये आढळतो.


चिली पेपर्स :
तिखट खाद्यपदार्थांची आवड असलेल्या व्यक्तींसाठी चांगली बातमी आहे की, चिली पेपर्स फॅट कमी करण्यास मदत करतो. यामध्ये कॅप्सेसिन असते, ज्यामुळे यांची चव तिखट असते. कॅप्सेसिनच्या सेवनाने शरीराचे तापमान वाढते. परिणामी, कॅलरीज लवकर बर्न होतात.


थोडे नवीन जरा जुने