किचनमधील या 6 गोष्टी आरोयासाठी घातक ठरू शकतात




तसं पाहायला गेलं तर आपण आपल्या किचनमध्ये खाण्याच्या सर्व आरोग्यदायी गोष्टी ठेवतो. परंतु नकळतपणे अशाही काही गोष्टी घेऊन येतो, ज्या आरोयासाठी घातक ठरू शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या आहेत त्या गोष्टी.
फळांमधील बिया


फॉक्स न्यूजनुसार, सफरचंद आणि चेरीसारख्या फळांच्या बियांमध्ये एक प्रकारचे हायड्रोजन सायनाइड असते यालाच प्रूसिक अॅसिड (Prussic acid) म्हणतात. हे अॅसिड आरोग्यासाठी हानीकरण ठरते. यामुळे फळांमधील बिया असलेला भाग खाण्यापासून दूर राहावे.
बटाटे
अंकुरित बटाटाच्या वापरही आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. रिपोर्टनुसार, बटाट्याचे हिरवे अंकुर आणि पानांमध्ये ग्लायकोअल्कोलाइड्स नावाचे रसायन आढळून येते, याच्या सेवनाने डायरिया, पोटदुखी आणि डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. हे रसायन जास्त दिवस प्रकाशात ठेवल्याला बटाट्यामध्येही आढळून येते.
बदाम
बदाम दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे गोड आणि दुसरा हलका कडसर बदाम. एका शोधानुसार कडसर बदामामध्ये जास्त प्रमाणात हायड्रोजन सायनाइड आढळून येते, जे शरीरासाठी घातक ठरते.
मध
एका रिपोर्टनुसार मधाच्या पोळ्यातून काढलेला मध तसाच खाऊ नये, कारण काही पोळ्याच्या मधामध्ये ग्रेयानोटॉक्सिन आढळून येते. याचे सेवन केल्यास शिथिलता आणि कमजोरी निर्माण होण्याची शक्यता राहते. यामुळे प्रक्रिया केलेला मध खाण्यासाठी वापरावा.
हिरवे टोमॅटो -
फॉक्स न्यूजनुसार, टोमॅटोच्या फांद्या, पानांमध्ये अल्कली नावाचा विषारी घटक असतो आणि हा घटक हिरव्या टोमॅटोंमध्येही असतो. यामुळे हिरवे टोमॅटो खाण्यापासून दूर राहावे किंवा आगीवर भाजून खावेत.
कच्चे काजू बाजारातून आपण खरेदी करतो ते काजू हे कच्च्या काजूपासून भाजून किंवा वाफेवर तयार केलेले असतात. कच्चे काजू अशा प्रकारे भाजल्याने त्यात असलेल्या उर्शिऑल नावाच्या रासायनिक पदार्थाचा नाश होतो. या उर्शिऑलमध्ये विषारी तत्वे असतात. त्यामुळे कच्चे काजू खाणाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. प्रामुख्याने यामुळे अॅलर्जी होण्याचे प्रमाण अधिक असते.


थोडे नवीन जरा जुने