पायांना मजबूत / सक्षम / सौडोल करण्यासाठी या टिप्स




तुम्ही आठवड्यातून 3-4 दिवस वर्कआऊट करत असाल व वजन नियंत्रणात असेल तर काही विशेष व्यायाम प्रकार करणे गरजेचे आहे. लोअर बॉडी वर्कआऊटमध्ये पायांची सक्षमता फार महत्त्वाची आहे.

अपर बॉडी तुलनेने लवकर नियंत्रणात येते. मात्र लोअर बॉडीसाठी विशेष व अचूक व्यायाम प्रकारांची गरज असते. यात आहार व आनुवंशिकता हे घटकही महत्त्वाचे असतात. गुणसूत्रांच्या प्रवृत्तीप्रमाणे चरबीचे शरीरात वितरण होत असते.
कोणत्या भागात स्थूलता वाढते हे अनेकदा गुणसूत्रांच्या प्रभावाने ठरते. वर्कआऊटने शरीरयष्टी बदलता येत नाही, मात्र स्नायूंना व्यवस्थित टोन करणे शक्य असते. व्यायाम करताना या गोष्टी ध्यानात घ्या.

कार्डिओ वर्कआऊट वाढवा. स्विमिंग, जॉगिंग, स्टेपिंग व इंटर्व्हल ट्रेनिंगमुळे उष्मांक लवकर कमी होतात. कार्डिओ आठवड्यातून किमान 5 दिवस घ्या. 45 ते 60 मिनिटांचे कार्डिओ दरदिवशी आवश्यक आहे. त्यामुळे पायांचे स्नायूही आटोक्यात येतील.

पायांचे व्यायाम केल्याने फायदा होईल. एक दिवसाच्या मध्यंतराने हा व्यायाम करा. कार्डिओनंतरही लेग एक्सरसाइज घेता येते. हाय किक्स म्हणजे पायांना खांद्याच्या पातळीपर्यंत उचलणे. या किकमध्ये पाय शक्य तेवढा वर उचला. याचे 20 रिपीटेशनचे 2 ते 3 सेट घ्या.
बॉक्स स्टेप-
अप : 10 ते 12 इंच उंचीचे स्टेपर यासाठी वापरा. डाव्या व उजव्या पायाने एकानंतर एक स्टेप-अप्स करा. याचा सराव झाल्यावर स्टेपर जंप सुरू करा.

स्क्वॅड्स :

रेग्युलर स्क्वॅड्सचा सराव झाल्यावर त्याची वारंवारिता वाढवा. नंतर जंपिंग करा. बोसू बॉल स्क्वॅडस्चे सेटही अल्टरनेट घ्या.
लंजेस :
सर्वप्रथम याचे तंत्र अवगत करा. याच्या पोझिशन्समध्ये प्रावीण्य मिळवल्यावर त्याचे विविध प्रकार शिकून घ्या. यात वॉकिंग लंजेस व अल्टरनेट लंजेस अधिक उपयोगी ठरतील.


थोडे नवीन जरा जुने