दोरीवरून उड्या मारणे हा अष्टपैलू व्यायाम गुडघे, टाचा, पोटर्‍या आणि जांघांना मिळेल मजबुती
दोरीवरून उड्या मारण्याला अष्टपैलू व्यायाम म्हटले जाऊ शकते. दोरी खूप स्वस्त असून व्यायामाचे चांगले साधन आहे. ही दोरी बॅगमध्ये सहजपणे ठेवता येते. याचा कुटुंबातील सर्वजण वापर करू शकतात.

यामुळे तुमची फिटनेस चांगली राहते. तसेच यामुळे शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होऊन वजन कमी करण्यात आणि फिट ठेवण्यात मदत होते. सोबतच आपल्या शरीराला चांगला आकार मिळतो.

जे लोक भारी व्यायाम करणे पसंत करतात त्यांच्यासाठी दोरीवरून उड्या मारणे वॉर्म-अप व्यायामासारखे आहे. खेळाडूदेखील याचा वापर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि आपली एकाग्रता वाढवण्यासाठी करतात.

ही तुमच्यासाठी उत्तम कार्डियोव्हेस्क्युलर एक्सरसाइज ठरेल. तसेच हृदयासाठीही हा व्यायाम उत्तम आहे.

दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे -

अशी निवडा दोरी
रोप जम्पिंग व्यायामासाठी योग्य दोरीची निवड करणे गरजेचे आहे. ही निवड करण्यासाठी तुम्ही दोरीच्या मध्यभागी उभे राहा. आता दोरीचे हँडल्स वर उचलून ओढा. हँडल तुमच्या खांद्याच्या हाडाच्या वरच्या भागाच्या जवळपास 6 इंच खाली असावे. म्हणजेच अध्र्या दोरीची लांबी जमिनीपासून तुमच्या खांद्याच्या हाडाच्या वरच्या भागाच्या खालपर्यंतच असावी. ही दोरी तुमच्या उंचीच्या हिशेबाने योग्य असेल आणि तुम्ही सहजपणे हालचाल करू शकाल. जास्त लांब दोरी तुम्हाला उंच उडी मारण्यासाठी भाग पाडू शकते. खूप लहान दोरी तुम्हाला पाडूही शकते.

कॅलरी मीटर
70 ते 75 किलो वजनाच्या व्यक्तीने जर सरासरी वेगाने एक तास दोरीवरून उड्या मारल्या तर तो जवळपास 730 कॅलरी जाळेल. तुम्ही किती कॅलरी जाळता, हे तुमचे वजन, वेग आणि दोरीवरून उड्या मारण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. साधारणपणे लठ्ठ लोक जास्त कॅलरी जाळतात. कारण त्यांना उड्या मारण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते.


दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे -

1. यामुळे तुमचे हृदय, फुप्फुस आाणि स्नायूंना थेट फायदा पोहोचतो.

2. यामुळे तुमची ताळमेळ बसवण्याची क्षमता, संतुलन, वेग आणि हात व डोळ्यांमधील ताळमेळ चांगला राहतो.

3. दोरीवरून उड्या मारल्याने तुमचे गुडघे, टाचा, पोटर्‍या आणि जांघांना मजबुती मिळते.

4. यामुळे मेंदू आणि नर्व्हस सिस्टिम अधिक सक्रिय होते.

5. खांदे, हात आणि कमरेच्या स्नायूंवर थेट परिणाम होतो आणि त्यांना मजबुती मिळते.

6. कॅलरी जाळण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त असून यामुळे वजनही कमी होते.थोडे नवीन जरा जुने