'हे' मिश्रण तुमचा चेहरा चमकवेल, अशी करा विधीअनेकदा जास्त कॉस्मेटिक्स वापरल्याने त्वचेचा रंग जास्त डार्क होतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि उजळ करण्यासाठी कॉस्मेटिक्स न वापरता काही घरगुती उपाय करून सावळेपणा कमी होईल आणि चेहरा ग्लो करेल. आज आम्ही तुम्हाला त्वचा उजळ करणारे काही खास घरगुती उपाय सांगत आहोत.
1. एक बादली थंड किंवा कोमट पाण्यात दोन लिंबाचा रस मिसळून काही महिने स्नान केल्यास त्वचेचा रंग उजळू लागेल.

2. आवळ्याचा मुरब्बा दररोज एक नग खाल्ल्याने दोन-तीन महिन्यात त्वचा तजेलदार होऊ लागेल.

3. चिंचाचा गर त्वचेवर लावून थोड्या वेळाने चेहरा धुवून घ्या. या उपायाने रंग उजळ होईल.

4. एक छोटा चमचा घेऊन त्यामध्ये तेवढेच पाणी टाका. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. पंधरा मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या.


5. दोन चमचे बेसन पिठामध्ये एक चमचा हळद मिसळून यामध्ये दहा थेंब गुलाबपाणी आणि दहा थेंब लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. स्नान करण्यापूर्वी हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासाने चेहरा धुवून घ्या.

6. हाताच्या कोपऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी गुलाबपाणी आणि ग्लिसरीनमध्य लिंबाचा रास मिसळून लोशन तयार करून घ्या. हे लोशन पाच मिनिट उनात ठेवा. दररोज या मिश्रणाने हाताचे कोपरे स्वच्छ करा.


7. अर्धा ग्लास गाजराचा रस सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास चेहरा उजळ होण्यास मदत होईल.

8. मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा तजेलदार दिसेल.

9. एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रास एकत्र करून चेहऱ्यावर लावा. त्वचा उजळेल.

10. एक चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे शेंगदाणा तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा धुवून घ्या. या उपायने चेहरा चमकू लागेल.थोडे नवीन जरा जुने