हा व्यायाम मांड्या मजबूत ठेवण्यासाठी मदत करेल



मांड्या हा शरीराचा महत्त्वाचा हिस्सा आहे. शरीराचा संपूर्ण भार याच स्नायूंवर अवलंबून असतो. त्यामुळे मांड्या मजबूत असणे खूप गरजेचे आहे.
मांड्यांच्या स्नायूंना बळकटी देण्यासोबतच त्यांची टोनिंग करणेही महत्त्वाचे आहे. यामुळे मांड्यांचा आकार योग्य राहील आणि त्यांची कार्यक्षमताही वाढेल. जाणून घेऊया मांड्यांसाठी फायदेशीर असलेल्या व्यायामांबाबत.
प्रिझनर स्क्वॅट्स :

आपले दोन्ही पाय खांद्याच्या बरोबरीने ठेवत उभे राहा. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे घेऊन जा आणि पाठ सरळ ठेवत दोन्ही गुडघे वाकवा. जेव्हा दोन्ही मांड्या जमिनीच्या समांतर येतील तेव्हा थांबावे आणि पुन्हा आधीच्या स्थितीत यावे. असे पुन्हा करता येईल.


रिव्हर्स लंजेस :
कमरेच्या बरोबरीने दोन्ही पाय ठेवत दोन्ही हातांमध्ये डंबेल्स पकडून जमिनीवर सरळ उभे राहा. आता डाव्या पायाने मागे सरकत गुडघा वाकवा. जेव्हा उजवी मांडी जमिनीच्या समांतर येईल तेव्हा थांबा. असे करत असताना डावी मांडी जमिनीपासून एक इंच वर असली पाहिजे. आता आधीच्या स्थितीत या आणि असे पुन्हा करा.
थोडे नवीन जरा जुने