या सवयीमुळे गुडघ्यांना संधिवात होतो
संधिवात हा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. सांधेदुखी म्हणजे सांध्यावर आलेली सूज. मात्र, एकूणच शरीरातील सर्वच लहान मोठे सांधे व आसपास असणारे स्नायूंचे भाग यांच्या दुखापतीला ढोबळ मानाने सांधेदुखी संबोधले जाते. वात ही शरीरात हालचाली घडवून आणणारी शक्ती आहे. सांध्याच्या हालचालीत कोणत्याही कारणाने बाधा आली की, त्यास संधिवात असे म्हणतात.


संधिवाताचे अनेक प्रकार-संधिवात अनेक प्रकारचा असल्यामुळे त्या त्या संधिवाताची कारणे वेगवेगळी दिसून येतात. वार्धक्य, स्थूलपणा, सांध्यांना पूर्वी झालेली इजा किंवा अतिश्रमामुळे अथवा व्यवसायाच्या विशिष्ट सवयीमुळे मुख्यत्वे गुडघ्यांना संधिवात होतो. गुडघ्यांना संधिवात हा स्त्रियांमध्ये मासिक पाळी गेल्यानंतर जास्त प्रमाणात आढळून येतो. संधिवात हा समाजात दुर्धर आजार मानला जातो. पूर्वी अ‍ॅलोपॅथीत योग्य औषधोपचार नसल्याने सुजेच्या संधिवाताच्या बहुतेक रोग्यांचे सांधे वेडेवाकडे झाले. मात्र, आता तसे राहिलेले नाही, अ‍ॅलोपॅथीत आता नवनवीन औषधे या आजारावर उपलब्ध झालेली आहेत. व त्यांचे फार चांगले परिणाम रुग्णावर दिसून येत आहेत. एका दिवसातच रुग्णाला चालवण्याचे जादुई काम करणारी नवी जैविक औषधे निघाली आहेत. ती महागडी आहेत. 

आमवात तसेच इतर आजारात त्वरित निर्णय घेऊन अचूक उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. उपचारासाठी तीन महिन्यांचा जर उशीर झाला, तर सांध्यांची कधीही भरून न येणारी हानी होऊ शकते. दुर्दैवाने ठिकठिकाणी फिरून अखेरचा उपाय म्हणून रुग्ण ºहुमॅटालॉजिस्टकडे येतात; पण तेव्हा सुरुवातीच्या उपचारांची सुवर्णसंधी निघून गेलेली असते.संधिवाताचे आजार दीर्घकाळ चालणारे असतात त्यामुळे रुग्णांनी स्वत:चे मनोबल टिकवणे महत्त्वाचे असते.
एकूणच काय की, समाजामध्ये या आजाराविषयी आणखी जागरूकता येणे आवश्यक आहे. त्यासाठीच हा खटाटोप. संधिवाताची लक्षणे-सांध्यावरील वेदना, सूज व कडकपणा ही तीन मुख्य लक्षणे संधिवातात आढळतात. सांधेदुखीमुळे जीविताला धोका सहसा होतच नाही; पण योग्य उपचार न घेतल्यास शारीरिक व्यंग (विकलांगता) येऊ शकते. वेळीच योग्य उपचार घेतल्यास त्यावर नियंत्रण जरूर ठेवता येते. सांधेदुखीचे जवळजवळ 100 प्रकार आहेत.
त्यापैकी ºहुमॅटॉइड आरथ्रायटिस (आमवात) व ओस्टिओ आरथ्रायटिस हे दोन मुख्य प्रकार आढळून येतात. तसेच इतर प्रकार पुढीलप्रमाणे.
1.हुमॅटॉइड आरथ्रायटिस 2. ओस्टिओ आरथ्रायटिस 3. जुवेनाइल इडिओपॅथिक आरथ्रायटिस 4.एसएसईबरोबर होणारा आरथ्रायटिस 5. गाऊटी आरथ्रायटिस 6. अ‍ॅन्कायलोजिंग स्पॉन्डिलायटिस 7. सारकायडोसिस. 8. ट्युबर क्युलॉसिस (रिअ‍ॅक्टिव्ह आरथ्रायटिस) 9. चिकुनगुन्या आरथ्रायटिस 10. व्हॅस्क्युलायटिस 11. गर्भारपणातील ºहुमॅटिक आजार व त्यामुळे वारंवार होणारे गर्भपात. 12. याखेरीज निदान न झालेला ज्वर.


थोडे नवीन जरा जुने