'हे' छोटस सिक्रेट तुम्हाला दीर्घकाळ तरुण आणि सुंदर ठेवेलफेस मास्क, उटणे आणि विविध प्रकारचे स्किन ग्लोइंग प्रॉडक्ट्स सौंदर्य वाढवण्यास खूप वेळ लावतात आणि तसेच याचा प्रभाव शरीराच्या त्याच भागावर दिसतो, जेथे वारंवार याचा वापर केला जातो. परंतु त्वचेला अंतर्गत पोषण देण्यासाठी काही खास उपाय करून याचे त्वरित आणि दीर्घकाळापर्यंतचे फायदे तुम्ही घेऊ शकता.
यासाठी दुध आणि मधाने स्नान करणे सर्वात उत्तम उपाय आहे. मधामध्ये अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-ऑक्सीडेंट, अँटी-फंगल यासारखे विविध गुण आढळून येतात, जे त्वचा कोमल बनवण्याचे काम करतात. दुधामध्ये विविध प्रकारचे मिनिरल्स आणि व्हिटॅमिन ए, बी, डी, कॅल्शियम, लॅक्टिक एसिड गुण आढळून येतात. मध आणि दुध एकत्रित करून वापरल्यास स्किन सॉफ्ट होण्यासोबतच उजळते.

त्वचेच्या कोमलतेसाठी
दुध आणि मध मिसळून स्नान केल्यास त्वचा कोमल राहते. दुधामधील प्रोटीन आणि फॅटचे प्रमाण त्वचेला आतून एक्सफोलिएट करण्याचे काम करते. या व्यतिरिक्त दुधातील लॅक्टिक अॅसिड मृत पेशींना (डेड सेल्स) दूर करण्याचे काम करते. यामुळे त्वचेवरील ड्रायनेस कमी होतो.

स्किन अ‍ॅलर्जी राहते दूर
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना स्किन अॅलर्जीची समस्या दिसून येते. ही अॅलर्जी कपड्यांपासून सर्दी-खोकला यासारख्या कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. यापासून दूर राहण्यासाठी मध आणि दुधाने स्नान करणे फायदेशीर ठरते. तसेच यामुळे त्वचेचे अंतर्गत पोषण होते. दुध आणि मधामध्ये अँटी-बॅक्टीरियल गुण असल्यामुळे इन्फेक्शनची समस्या दूर होते.


अँटी-एजिंगमध्ये सहाय्यक

दुध आणि मध दोघांमधेही अँटी मायक्रोबोइल गुण आहे. यातील या गुणामुळे जास्तीत जास्त ब्युटी प्रोडक्टमध्ये यांचा वापर केला जातो. हे मिश्रण त्वचेची कोमलता कायम ठेवण्यासोबतच अवेळी येणाऱ्या वृद्धावस्थेपासून दूर ठेवते. हे वाचून आश्चर्य वाटेल परंतु नियमितपणे दुध आणि मधाच्या मिश्रणाने स्नान केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.


मध आणि दुध एकत्रितपणे घेतल्यास थेट नर्वस सिस्टमवर प्रभाव पडतो. दुध त्वचेला कोमल बनवते तर मध त्वचेला पुन्हा नवजीवन प्रदान करण्यात सक्षम आहे. स्पासाठी या मिश्रणाचा उपयोग फायदेशीर राहतो. अरोमासाठी सी सॉल्ट आणि लेव्हेडंर ऑइल वापरले जाते. तणाव दूर करण्यासाठीसुद्धा या मिश्रणाने स्नान करणे उपयुक्त ठरते.


थोडे नवीन जरा जुने