हाडे आणि सांधेदुखीच्या तक्रारीवर हा रामबान उपाय


हिवाळ्यामध्ये हाडे आणि सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. खास करून मध्यमवयीन लोकांना याचा अधिक त्रास जाणवतो. यापासून सुटका करायची असेल तर मॉर्निंग वॉकसोबतच भरपूर ऑक्सिजन घेणे आणि कॅल्शियम-व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करणे योग्य ठरते. जाणून घ्या संधिवातावर मात करण्यासाठी उपाय

सकाळचा फेरफटका याेग्यसकाळी फेरफटका मारणे हिवाळ्यात खूप फायद्याचे ठरते. यामुळे शरीरामध्ये उष्णता टिकून राहते. शिवाय या ऋतूमध्ये होणाऱ्या समस्यांपासूनही आराम मिळतो. फेरफटका मारल्याने शारीरिक आणि मानसिक क्षमतादेखील वाढते आणि तणाव दूर होतो. जिममध्ये व्यायाम करणे, चालणे, धावणे, जिना चढणे किंवा डान्स केल्याने हाडे बळकट होतात. वाढत्या थंडीसोबतच सांधेदुखीचा त्रासही वाढतो. त्यामुळे दररोज कमीत कमी तीन किलोमीटर अवश्य चालावे. यामुळे हाडांना उष्णता मिळते आणि ते लवचिक होतात. जे लोक हिवाळ्यात ऊन खात नाहीत त्यांना हाडांचा त्रास अधिक जाणवतो.

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स


हिवाळ्यामध्ये पुरेसे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, खनिज आणि इतर पोषक द्रव्ये मिळत असल्याने हाडे आणि सांधेदुखीच्या समस्येपासून सुटका होते. दूध, दही, ब्रोकली, हिरव्या पालेभाज्या, तीळ, अंजीर, सोयाबीन आणि बदामाचे दूध आदी पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करत कॅल्शियमची कमतरता पूर्ण करता येते. सूर्य किरणे व्हिटॅमिन डीचा सर्वात चांगला स्रोत आहेत. दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सोया दूध आणि बदामाच्या दुधात व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असते.

गरम तेलाने मालिश करा


हिवाळ्यात मोहरी किंवा ऑलिव्ह ऑइलने शरीराची मालिश करा. उन्हात मालिश केल्याने दुप्पट फायदा मिळेल. शरीराचा एखादा विशिष्ट भाग दुखत असेल तर गरम तेलाने मालिश केल्यास आराम मिळेल आणि हाडांमध्ये लवचिकता येईल. तसेच हलक्या गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने पाय शेकून घेतल्यानेही सांध्यांना आराम मिळतो. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर लगेच हवेत जाण्याचे टाळले पाहिजे.

भरपूर ऑक्सिजन घ्या


हिवाळ्यामध्ये रक्तवाहिन्या आकुंचित होतात. त्यामुळे रक्तप्रवाह सामान्य पद्धतीने होत नाही. शरीराच्या विविध अवयवांपर्यंत रक्त, पाणी आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने शरीराच्या मज्जातंतूंमध्ये दाब निर्माण होतो. यामुळे हाडे दुखायला लागतात. त्यासाठी आहारामध्ये पपई, कलिंगड, आंबा आदी रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याचे काम करणाऱ्या फळांचा समावेश करावा. मोड आलेली कडधान्ये आणि लिंबाच्या सेवनानेही ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करता येते. नियमितपणे योगासने व व्यायाम केल्याने आकुंचित रक्तवाहिन्या सामान्य स्थितीत येतात. यामुळे रक्तप्रवाह सामान्य व्हायला लागतो. हिवाळ्या कोमट पाण्याच्या सेवनानेही ही समस्या सुटू शकते.

एकाच ठिकाणी जास्त बसू नका


जे लोक संगणकासमोर जास्त वेळ बसून राहतात त्यांना सांधेदुखीचा त्रास होणे सामान्य बाब झाली आहे. एकाच जागेवर बराच वेळ बसल्याने हाडे थंड आणि आकुंचित होतात. यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. यापासून बचाव करण्यासाठी थोड्या-थोड्या अंतराने उठून शरीर स्ट्रेच करावे. बराच वेळ एकाच स्थितीत बसू नये.

थोडे नवीन जरा जुने