"हे" आसन पाठीचे दुखणे कमी करण्यात मदत करेलकोणासन केल्याने शरीराच्या दोन्ही बाजू आणि मणक्याला ताण बसतो. हात, पाय आणि पोटातील अवयव बळकट बनतात. पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते.

पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते.

कसे करावे
कंबरेएवढे पायात अंतर घेऊन ताठ उभे राहूया.
हात शरीराजवळ असूद्या. श्वास आत घेत डावा हात, हाताची बोटे छताकडे करत वर उचलूया.

श्वास सोडत उजवीकडे झुकूया, पहिल्यांदा मणक्यातून, मग कंबर डावीकडे घेत आणखी झुकूया.

कोपर ताठ ठेवत मान वळवून डाव्या हाताच्या तळव्याकडे पाहूया.
दीर्घ श्वसन सुरु ठेऊया.

श्वास घेत सरळ होऊया.

श्वास सोडत डावा हात खाली घेऊया.

उजव्या हाताने संपूर्ण आसन पुन्हा करूया.

कोणी करू नयेतीव्र पाठदुखी आणि ज्यांच्या मान तसेच पाठीच्या मणक्यातील अंतर कमी जास्त झाले असेल(स्पोंडिलायटिस) त्यांनी हे असं करू नये.


थोडे नवीन जरा जुने