'हे' एकच फळ तुम्हाला कायम ठेवेल तरुण, जाणून घ्या कोणते आहे हे फळरंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणून डाळिंबाला ओळखले जाते. जगात ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या फळांपैकी हे एक फळ आहे. हे फळ आरोग्‍यासाठी लाभदायी फळ म्‍हणून ओळखले जाते.
चवदार डाळिंबामध्‍ये व्हिटामिन्‍स ए, सी, ई, बरोबरच फ्लोरीक अ‍ॅसीड या रासायनिक घटकाबरोबरच अँटी ऑक्‍सीडेंट मोठ्या प्रमाणात आहेत. डाळिंबाचा प्रत्‍येक भाग शरीरासाठी उपयोगी ठरतो. विविध आजारांवर उपाय म्‍हणून या फळाचा आहारात वापर करण्‍यात येतो.
पोटाचे आजार डाळिंबामुळे बरे होतात. फुफ्फुस, यकृत, हृदय, याबरोबरच विविध आजारावर डाळिंब गुणकारी आहे. डाळिंबाची साल आरोग्यवर्धक आहे.

वाळलेल्‍या डाळिंबाची पावडर दररोज पाण्‍यात टाकून सेवन केल्‍यानंतर लघवी करताना त्रास होत नाही.

खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्‍यासोबत घेतली तर खोकल्‍याची उबळ येणे बंद होते.

साल उकळून या पाण्‍याने गुळना केला तर तोडांचा वास येत नाही.

महिलांना मासिक पाळीच्‍या वेळेला जास्‍त रक्‍तस्‍त्राव होत असेल तर डाळींबाची साल पेस्‍ट करून पाण्‍यामध्‍ये घेतल्‍यानंतर रक्‍तस्‍त्राव होत नाही.

डाळिंबाची पेस्‍ट आणि दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्‍यानंतर केस गळत नाहीत, मुलायम होतात.

पुढील स्‍लाईडवर वाचा आहारात डाळिंबाचे महत्त्व...


अ‍ॅथेरॉसक्‍लेरॅसिस आजारात चांगला आणि सोपा उपाय म्‍हणून डाळिंबाचा उपयोग करता येतो. वाढणारे वय, खाण्‍याच्या चुकीच्या पद्धतीमुळे रक्‍तवाहिन्‍या 'टणक' होतात. यामुळे रक्‍तप्रवाहामध्‍ये अडथळा निर्माण होतो. डाळिबामधील अँटीऑक्सिडेंटचे गुण रक्‍तवाहीन्‍यांचे घनत्त्‍व निर्माण करणा-या लिपोप्रोटीन आणि कॉलेस्‍ट्रॉल यांचे प्रमाण नियंत्रीत करतात. यामुळे रक्‍तवाहिण्‍यांची घनता वाढत नाही. रक्‍तपुरवठा सुरळीत होण्‍यास मदत होते.

कॉलेस्‍ट्रॉल किंवा हृदयाच्‍या आजारांवर डाळिंब हे फळ रामबाण उपाय म्‍हणून काम करते. शरीरात रक्‍त दोन पद्धतीने साकाळते. एक तर काही जखम झाल्‍यांनतर किंवा रक्‍तवाहिण्‍याच्‍या अंतर्गत अडचणीमुळे रक्‍त जमा होते. अशा प्रकारचे रक्‍त जमा होणे आरोग्‍यासाठी धोकादायक असते. आहारात डाळिंबाचा जास्‍तीत जास्‍त वापर शरीरातील रक्‍त पुरवठा सुरळीत करतो.

डाळिंबाचे नियमीत सेवन केले तर डीएनए ऑक्‍सीडेशनची प्रक्रिया मंदावते. याचे मुख्‍य कारण म्‍हणजे डाळिंबातील अँटीऑक्‍सीडेंट असल्‍याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. वाढत्‍या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडाइजिंगचे प्रमाण्‍ा नियंत्रीत ठेवण्‍याचे प्रमाण डाळिंब करते.

डाळिंबाच्‍या पानाचा चहा करून प्‍यायल्‍यानंतर पचनसंस्‍थेतील अडचणी दूर होतात. कॉलरा सारख्या आजारावर डाळिंबाचे ज्‍यूस लाभदायक उपाय असल्‍याचे संशोधकांचे मत आहे. शुगर असलेल्‍या व्‍यक्तिने डाळींबाचा रस प्‍यायल्‍यानंतर कॉरोनरी आजारापासून बचाव होतो.


डाळिंबाचे फळ आहारात घेतल्‍याने किंवा डाळिंबाचे ज्यूस ‍नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. डाळिंबाच्या ज्यूसमुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो. एवढेच नव्हेत व्यक्तिची स्मरणशक्ती वाढते व त्याचा मूडही चांगला राहतो.

जर एखादा पुरुष तसेच महिला दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस नियमित घेत असेल तर त्यांना व्हायग्रा घेण्याची गरज भासत नाही. डाळिंबाचे ज्यूस व्हायग्रापेक्षाही प्रणय पॉवर वाढविण्‍यासाठी मदतगार ठरतो.

21 ते 64 वयोगटातील 58 स्त्री-पुरूषांवर एक संशोधन करण्यात आले होते. त्यापैकी काही लोकांना डाळिंबाचा ज्यूस देण्यात आला. तर काहींना व्हायग्रा देण्यात आले. अभ्यासात असे दिसून आले की, डाळिंबाचे ज्यूस घेतलेल्या पुरुषांसह स्त्रियांमध्येही प्रणय पॉवर वाढली आहे.
थोडे नवीन जरा जुने