ताण तणावाला दूर करण्यासाठी उपाय करून थकलात ? मग हे करून पहा
तणाव कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. अथक परिश्रमा नंतरदेखील तणाव कमी होत नसल्यास लोक आणखी निराशेत जातात. यापासून वाचण्यासाठी काही सहजसोपे उपाय करता येतील, जे तणाव कमी करण्यासाठी पुरेसे ठरतील.

40 टक्के भारतीय कॉर्पोरेट कर्मचारी तणावाला बळी पडतात.
10 टक्के लोकच तणावाच्या उपायासाठी डॉक्टरकडे जातात.

1. हसमुख राहा
सदैव हसत राहिल्याने तुम्हाला तणावाचा सामना करण्याची शक्ती मिळते. हसतमुख राहिल्याने स्वत:लाच आपण तणाव नसल्याचे वाटू लागते. हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.


2. हातांना गरम करा
आपण जेव्हा तणावात असतो, तेव्हा रक्तप्रवाह वेगाने होतो. असे झाल्याने शरीरातील काही भाग वेगाने थंड पडू लागतात. याची जाणीव होताच दोन्ही हात एकमेकांवर घासल्याने यात उष्णता निर्माण होते. परिणामी, तणावामुळे शरीरावर होत असलेला विपरीत प्रभाव कमी करता येतो. हात घासल्याने तणावदेखील वेगाने कमी करता येतो.


3. दान करावे
दान केल्याने बहुतांश लोकांना मानसिक शांती मिळते. असे केल्याने आपल्याला सामाजिक जबाबदारीची जाणीवदेखील होते. या भावनेनेच आपल्याला मोकळे वाटू लागते. एकदम भरमसाट दान न करता थोड्याथोड्या प्रमाणात जास्त दान करावे. असे केल्याने मनाला जास्त शांती मिळते.


4. धान्याचा वापर वाढवा
जर तुम्हाला जास्त निराशा वाटत असेल, तर होल ग्रेन (न वाटलेले धान्य) आहारात वापरावे. असे केल्याने तुम्हाला तत्काळ ऊर्जा मिळेल आणि तणाव दूर होईल. होल ग्रेनमध्ये मोठय़ा प्रमाणात काबरेहायड्रेट्स असतात. त्यातून शरीरातील शुगर लेव्हल वाढते आणि व्यक्तीला उत्साही वाटू लागते.


5. व्यायाम करावा
थोडा वेळ व्यायाम केल्याने मूड पूर्णपणे बदलता येतो. आपला मूड चांगला नाही, असे वाटत असल्यास व्यायाम करावा. त्यामुळे शरीरात हालचाल होऊ लागते आणि व्यक्तीला लवकरच तणावमुक्त वाटू लागते.


6. विचार बदला
विचारसरणी बदलल्याने तणावाचा सामना करण्याची शक्ती मिळते. असे केल्याने मेंदूत चालत असलेले नकारात्मक भाव कमी होतात आणि त्यांची जागा सकारात्मक भाव घेतात. विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही पद्धत सर्वात उपयोगी ठरते.


7. छंद जोपासावा
आपले आवडते काम करत राहिल्यास तणाव 29 टक्क्यांपर्यंत कमी करता येतो. बागकाम, गाणे, डान्सिंगसारख्या आपल्या छंदाला काही वेळ दिल्यास तणावाला दूर ठेवता येते.


थोडे नवीन जरा जुने