फॅट्स कमी करण्यासाठी..नो इलेक्ट्रॉनिक्स-

आज काल आपल्यापैकी प्रत्येकाला झोपण्यापूर्वी निरंतर फोन चेक करायची सवय असते किंवा रात्री शो बघण्याची किंवा नेट सर्फिंग करण्याची सवय असते. प्रथमतः आपण आपल्या सवयी पूर्णपणे बंद कराव्यात. कारण यातून निघणाऱ्या शॉर्ट वेवलेंथ ब्लु लाईट्स आपल्या बॉडीचे चयापचय क्रिया कमी होते. याने आपल्या मेटाबॉलिझम मध्ये नादात होतो म्हणून इलेक्ट्रॉनिक्स चा वापर बंद ठेवा.

नो दारू-

चयापचय क्रिया हा आपल्या शरीरातील महत्वाची क्रिया आहे. दारू पिणारे व्यक्ती सहसा रात्री दारू पिणे पसंत करतात. यामुळे चयापचय क्रिया कमी होते. म्हणून दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींनी रात्री झोपण्याच्या किमान 3 तास अगोदर दारूचे सेवन करणे टाळावे. झोपताना अधिक कॅलरीज बर्न होतात.
नो हेव्ही फूड-
रात्री मसालेदार आणि भरपूर आहार घेणे सहसा टाळावे. कारण शरीराला ते पचवण्यासाठी जड जातं, याने चयापचय क्रिया कमी होते. झोपण्यापूर्वी जेवण पचले नाही तर त्याचे फॅट्स मध्ये रूपांतर होते.
नो लाईट-
रात्री चांगली झोप लागणे ही महत्वाचे आहे. त्यासाठी रात्री झोपताना पुर्णपणे अंधारात झोपणे पसंत करा. पूर्णपणे अंधारात झोपल्याने आपले शरीर अधिक मेलाटोनिन तयार करू शकते. याने फॅट्स बर्न होण्यास मदत मिळते.

कुलिंग-

थंड वातावरणात झोपणे हे फॅट्स बर्न करण्यासाठी अधिक फायद्याचे ठरते. करण थंड वातावरणातून सामान्य तापमान करण्यासाठी शरीर शरीर अधिक मेहनत घेतं ज्याने जलद गतीने कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे कुलिंगमध्ये झोपणारे 7% जलद गतीने कॅलरीज बर्न करू शकतात.

झोपण्याची वेळ-
आपल्या झोपेची वेळ निश्चित करा. कमी जास्त प्रमाणात झोप घेणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. कमी झोप घेणाऱ्यांचं वजन देखील जलद गतीने वाढते. म्हणून किमान 6-7 तास झोप घेणे आवश्यक आहे.
थोडे नवीन जरा जुने