'हे' खास साधे-सोपे उपाय करून पहा, केस मजबूत होतीलदररोजचा स्वयंपाक याशिवाय अपूर्ण ठरतो आणि प्रत्येक घरात आढळणारे धान्य म्हणजे तांदूळ. स्वयंपाकघरात हमखास तांदूळ असतोच. एकट्यासाठी काही तयार करायचे तर आपण भात लावतो.
हा सर्वात सोप्पा मार्ग असतो. तांदूळ शिजवला की झाले जेवण तयार. तांदळाचे अनेक आरोग्यदायी लाभही आहेत. मात्र, यात सौंदर्यवर्धक तत्त्वेही असतात हे क्वचित लोकांना ठाऊक आहे. तांदळामुळे त्वचेवरील चमक वाढवता येते. केसांसाठीदेखील तांदूळ गुणकारी आहे...
केसांचा पोत सुधारण्यासाठी :
हेअर स्ट्रेटनर आणि केमिकल्सच्या वापराने केसांचे नुकसान होते. केसांचा पोत सुधारण्यासाठी तांदूळ गुणकारी आहे. शॅम्पू केल्यानंतर तांदळाच्या पाण्याने केसांच्या मुळांना हलका मसाज द्या. पाच मिनिटे केस असेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ करून घ्या.

केस मजबूत करण्यासाठी :
अनेकदा केस कमकुवत होतात. सहजरीत्या केस तुटतात. अमिनो एसिड, जीवनसत्त्वे, खनिजे यांच्या अभावामुळे असे होते. त्यासाठी तांदळाच्या पाण्याने केसांना मसाज द्या. त्यामुळे केस अधिक मजबूत होतात.
केसांची चमक वाढवा :
तांदळाचे पाणी तुमच्या केसांना केवळ मजबुती देत नाही, तर त्यावर चमकही आणते. केसांना पोषण देण्यासाठी रोजमेरी, लॅव्हेंडर किंवा टी ट्रीसारखे तेल यात मिसळा.


चांगला शॅम्पू :
तांदळाचे पाणी उत्कृष्ट कंडिशनर आहेच, मात्र ते पाणी शॅम्पूसारखेही उपयोगी आहे. यात केवळ खिसलेला आवळा, शिकेकाई किंवा संत्र्याचे साल मिसळा. या मिश्रणाने केस स्वच्छ करा. यातून केस साफ होतात पोषणही मिळते.


क्लिंझिंगसाठी उपयुक्त :
तांदळाचे पाणी घ्या. कॉटन बॉल्सच्या साहाय्याने चेहरा गळ्यावर गोलाकार फिरवत मसाज द्या. त्यानंतर याच पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
चमकदार त्वचा :
तांदळाच्या पाण्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ही तत्त्वे त्वचेसाठी लाभदायी आहेत. यात फ्रॉलिक एसिड आणि एलनटॉइनमध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी इफेक्ट असतो. हे त्वचेसाठी लाभदायी आहे. तुम्हाला अति थकवा आला असेल तर हा उपाय योजता येईल. संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त.


त्वचाविकारांना दूर सारते :
वांग येणे, वाढत्या वयामुळे येणाऱ्या त्वचेच्या समस्या किंवा अतिनील किरणांचे दुष्परिणाम नियंत्रणात ठेवण्यासाठी भाताचे पाणी वापरा. प्रसाधनांमुळे झालेले नुकसानही भरून निघू शकते. त्वचेची रंध्रे अधिक पसरली असतील तर त्यांना आकुंचित करण्यासाठी भाताचे पाणी उपयुक्त ठरते.
चांगले टोनर :
भाताचे पाणी उपयुक्त टोनर आहे. तुमच्या त्वचेला मऊपणा येण्यासाठी उपकारक. मुरमांमुळे होणाऱ्या जखमा डाग कमी करते. अॅस्ट्रिजेंटप्रमाणे हे उपयुक्त ठरते. शिवाय रंध्रे कमी करते.


बॉडी स्क्रब :
उरलेल्या भाताला स्क्रबप्रमाणे वापरा. भात चांगला कुस्करून घ्या. त्यात २-३ चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा नारळ तेल , चमचे लिंबू रस किंवा इतर पोषक तेलांचा वापरही करू शकता. हे स्क्रब अंगाला लावता येते. यामुळे त्वचा मुलायम होते पोषणही मिळते.
थोडे नवीन जरा जुने