रोजच्या वापरातील भाज्यांमध्ये आहेत हे औषधी गुणधर्मभाज्यात विविध प्रकारचे व्हिटामिन आणि पोषक तत्त्वे असतात. यामुळे डॉक्टरसुद्धा निरोगी शरीरासाठी भाज्या खाण्याचा सल्ला देतात. आरोग्यविषयक समस्येनुसार भाज्याचा आहार घेतला पाहिजे, असे जाणकार म्हणतात. यामुळे भाज्यांचा जास्तीत जास्त फायदा मिळतो.

आज आम्ही तुम्हाला काही रोजच्या वापरातील भाज्यांमधील औषधी गुणांची ची माहिती देत आहोत.

भोपळा
भोपळ्यामध्ये कार्बोहायड्रेट आढळून येते, यामुळे ही भाजी सहजतेने पचते. यामध्ये वसाची मात्रा कमी असते. भोपळ्याची भाजी खाल्ल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो असे मानले जाते.

घोळाणा फुटत असल्यास भोपळा उकळून त्याची भाजी खाल्ल्यास आराम मिळेल.
गाजर
गाजरामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, वसा, फॉस्फरस, स्टार्च आणि कॅल्शियम या व्यतिरिक्त केरोटीन भरपूर प्रमाणात आढळून येते. लहान मुलांना गाजराचा रस दिल्यास दात सहजपणे येतात. त्यांना दूधही व्यवस्थित पचते.

जर तुम्हाला पचनाची सनस्य असेल तर दिवसातून दोन लाल गाजर खा. पचनाशी संबधित समस्या दूर होईल.

गाजरामध्ये फायबर जास्त प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे गाजर चावून-चावून खाल्ल्यास आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे पोटाचे आजार, गॅस, अ‍ॅसिडीटी होत नाही. गाजराचे ज्यूस नियमित पिल्यास त्वचा उजळते.


दररोज एक ग्लास गाजराचे ज्यूस पिल्यास स्मरणशक्ती वाढते. गाजरामध्ये कॅल्शियम व केरोटीन हे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे.

गाजरच्या रसामध्ये मीठ, कोथिंबीर, जिरं पूड, मिरे पूड व लिंबूचा रस टाकून प्यायल्याने पाचनक्रियेसंदर्भातील अडचणी दूर होतात.


पत्ता कोबी

पत्ता कोबीमध्ये रोटीन, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन (ए, बी, सी) व्यतिरिक्त लोह तत्व भरपूर प्रमाणात असते.

पत्ता कोबीमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असल्यामुळे इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते.

यामध्ये अ‍ॅमिनो अ‍ॅसिडही आढळून येते, यामुळे जखम, मार लागल्याची सूज कमी होते.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार पत्ता कोबीचे भरपूर प्रमाणात सेवन केल्यास अल्झायमरची समस्या दूर होते.

पत्ता कोबीचे पानं चावूनचावून खाल्ल्यास केस दाट होतात.

पत्ता कोबीचा रस सलग दोन-तीन महिने डोक्याला लावल्यास अकाली टक्कल पडण्याची समस्या दूर होते.


दोडका
कावीळ झालेल्या रुग्णाच्या नाकात दोडक्याच्या रसाचे दोन-तीन थेंब नाकात टाकल्यास पिवळ्या रंगाचा द्रव बाहेर पडतो. आदिवासली लोकांच्या मान्यतेनुसार यामुळे कावीळ बरा होतो.

अर्धा किलो दोडके बारीक कापून दोन लिटर पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये वांगे शिजवून घ्या. वांगे शिजल्यानंतर तुपामध्ये परतून घ्या आणि गुळासोबत सेवन करा. हा उपाय केल्यास मुळव्याधीचा त्रास कमी होईल.

दोडक्यामध्ये इन्सुलिनप्रमाणे पेप्टाईड्स आढळून येतात, यामुळे मधुमेहावर (डायबिटीस) नियंत्रण ठेवण्याचा हा उत्तम उपाय आहे.


दोडक्याच्या वेलाची पाने दुध किंवा पाण्यामध्ये उकळून पाच दिवस हे दुध किंवा पाणी पिल्यास उलटी व जुलाबामध्ये आराम मिळेल.

पालक-
कच्चा पालक फार गुणकारी आहे. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुरळीत काम करते. खोकला आणि फुफ्फुसावर आलेली सूज कमी करण्यासाठी पालकच्या रसाने गुळण्या कराव्यात. पालकच्या रसाने दृष्टीदोष कमी होतो. तसेच स्मरणशक्तीही वाढते. पालकमध्ये आयोडीन असल्याने थकवा दूर होतो.

उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांनी नियमित पालक सेवन करावे.


ह्रदयविकार असणार्‍यांनी दररोज सकाळी एक कप पालकच्या रसात दोन चमचे मध टाकून सेवन करणे हा एक गुणकारी उपाय आहे.

रक्ताक्षयाचा विकार असणार्‍या रुग्णांनी दिवसांतून तिनदा एक-एक ग्लॉस पालकाचा रस पिल्याने फायदा होतो.
थायरॉईडचा विकार असणार्‍यांनी एक कप पालकच्या रसात, एक चमचा मध, आणि एक चतुर्थांश जीर्‍याची पूड टाकून सेवन केल्याने आराम पडतो.

पालकच्या एक ग्लॉस रसात शेंधे मीठ टाकून सेवन केल्याने दमा आणि श्वसनाचे विकार दूर होतात. पालक रसात नारळ पाणी एकत्र करून पिल्याने मुतखडा विरघळून जातो.


थोडे नवीन जरा जुने