सावधान : नाहीतर तरुण वयातच म्हातारपण येईल
आपले वय जसे-जसे वाढत जाते त्याप्रमाणे त्वचेतील तजेलपणा हळू-हळू कमी होण्यास सुरूवात होते. यामध्ये आहाराकडे दुर्लक्ष, पोषक आहाराची कमतरता यामुळे देखील चेह-याचा तजेलपणा कमी होतो.

या सगळ्यांचा परिणाम तुमच्या चेह-यावर होण्यास सुरवात होते आणि चेह-यावर सुरकुत्या, चेहरा कोरडा पडणे आणि चेह-यावर काळे डाग पडण्यास सुरूवात होते.

तुम्ही कमी वयात म्हातारे दिसु लागतात. काही उपाय केल्यास तुम्ही अचानक येणा-या म्हातारपणापासुन वाचू शकता.
का दिसू लागता तुम्ही म्हातारे...

चुकीचा आहार -
चुकीच्या आहारामुळे आजकाल ब-याच जणांना अकाली म्हातारपण येण्यास सुरूवात झालेली आपल्याला दिसते. अधिक तेलकट पदार्थ खाणे,जंक फूड यामुळे त्वचेचे नुकसान होते. तसेच त्वचेवर पिपल्स, सुरकुत्या यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. शरीरातील प्रोटीन आणि जरूरी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुम्ही म्हातारे दिसू शकता.

कमी झोप -
कमी झोप झाल्यामुळे तुम्हाला अकाली म्हातारपण येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तूळे पडतात. ज्यामुळे चेह-याची चमक कमी होत आणि तुम्ही म्हातारे दिसू लागता. याशिवाय तुम्हाला इतरही आजारांचा सामना करवा लागण्याची दाट शक्यता असते.

तणाव -
छोट्या-छोट्या गोष्टींमुळे ताण घेतल्याने माणूस चिडचिडा होतो. या चिडचिडेपणामुळे तुमच्या चेह-यावर ताण येतो आणि तुम्ही वयाच्या आधिच म्हातारे दिसता.

धूम्रपान आणि दारूचे सेवन -
धूम्रपान आणि दारूचे सेवन अति केल्याने त्वचेवर सुरकुत्या आणि चेहरा कोरडा पडण्यास सुरूवात होते.

क्लींनिग :
दिवसभर आपल्या त्वचेवर धूळ माती आणि वातावरणातील प्रदूषण याचा मारा होत असतो. त्यामुळे चेह-याची नियमित स्वच्छता फार मह्त्वाची आहे. दिवसातुन चेहरा कमीत कमी तीनवेळा चांगल्या फेसवॉशने धुवावा. तसेच तुम्ही चेहरा साफ करण्यासाठी गुलाब पाण्याचाही वापर करू शकता.
मॉयश्चराइजिंग :
चांगल्या कंपनीचे मॉयश्चराइजर त्वचेचा ताजेपणा कायम ठेवण्यासाठी मदत करतो. ऍन्टी एजिंग क्रीमचा वापर करा. बाहेर जातांना सनस्क्रीन लोशन जरूर लावा.

व्यायाम :
व्यायामाने तन आणि मन दोन्ही सक्रिय राहण्यास मदत होते. सकाळ-संध्याकाळ नियमितपणे पायी चालणे, योगा आणि थोडा व्यायाम केल्याने त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.


आहार -
गाजर, मेवा, त्वचेसाठी चागले असते. त्याच बरोबर भरपूर पाणी पिण्यानेपण त्वचा तजेलदार दिसते .

लसुन -
लसुन स्वास्थ्यसाठी फायदेशीर आहे. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी याचा फार उपयोग होतो. शरिरातील रक्ताभिसरण यामुळे सुधारते.

- फळे- भाज्या -
फळे व भाज्या खाल्ल्याने मस्क्युलर डिजेनरेशनचा धोका कमी होतो. मस्क्युलर डिजेनरेशन वाढत्या वयात डोळ्यांची द्दष्टी कमी करण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे जेवणात भरपूर फळे आणि भाज्याचे सेवन करावे.

थोडे नवीन जरा जुने