हळद आणि दुध एकत्र सेवन केल्यास काय होईल ?
हळदीला सर्वात दमदार अँटीबायोटिक मानले जाते. त्वचा, पोट, आणि शरीरातील विविध आजारांवर हळद रामबाण उपाय आहे. अशाच प्रकारे दुधही निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

हळद आणि दुध एकत्र सेवन केल्यास शरीराला याचा दुप्पट फायदा होतो. आयुर्वेदानुसार थंडीमध्ये हळद आणि दुधाचे एकत्रित सेवन केल्यास विशेष लाभ होतो.

हळदीच्या दुधाचे उपाय जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा -
दररोज हळदीचे दुध पिल्यास शरीराला पर्याप्त मात्रामध्ये कॅल्शिअम मिळते. हाडे स्वस्थ आणि मजबूत होतात. यामुळे ऑस्टियोपोरेसिसच्या रुग्णांना आराम मिळू शकतो.


हळदीच्या दुधाचा शरीरावरील गाठ तसेच रियूमेटॉइड गाठेमुळे सूज असल्यास त्यावर उपचार करण्यासाठी उपयोग होतो. हळदीचे दुध हाडांचे जोड आणि पेशींमध्ये लवचिकपणा निर्माण करून वेदना कमी करण्यात फायदेशीर ठरते.


आयुर्वेदामध्ये हळदीच्या दुधाचा शोध क्रियेमध्ये वापर केला जातो. हळदीचे दुध रक्तातील टॉक्सिन्स दूर करून लिव्हर स्वच्छ ठेवते. पोटाशी संबंधित आजारांमध्ये हळदीच्या दुशाचे सेवन लाभकारक आहे.


एका संशोधनानुसार हळदीमध्ये उपस्थित तत्व कँन्सर कोशिकांमुळे डीएनएला होणारे नुकसान रोखतात आणि केमोथेरेपीच्या दुष्प्रभावांना कमी करतात.


हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीरावरील गाठीचे तसेच कानाचे आजार ठीक होतात. यामुळे शरीरातील रक्तसंचार वाढतो आणि वेदनेमध्ये आराम मिळतो.


चेह-यावरील डाग, सुरकत्‍या नष्‍ट करण्‍यासाठी हळद-दूधाची पेस्‍ट चेह-यावर लावल्‍यास त्‍वचेचा रंग उजळतो. हळद आणि काळे तीळ समप्रमाणात घेऊन त्‍याची पेस्‍ट बनवून चेह-यावर लावल्यास त्वचा उजळेल.


सर्दी-खोकला झाल्‍यास दूधात हळद घालून पिण्‍यास सांगितले जाते. अद्रक आणि एक चमचा हळदीच्या रसात मध मिसळून पिल्याने सर्दी-खोकला बरा होण्यास मदत मिळते.


दररोज एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून पिल्यास शरीर सुडौल बनते. कोमट दुधासोबत हळदीचे सेवन केल्यास शरीरात जमा झालेले फॅट्स कमी होतात. यामधील उपस्थित कॅल्शिअम आणि इतर तत्व वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात.


उत्तम अ‍ँटीसेप्टिक म्हणूनही हळदीकडे पाहिले जाते. दुधात हळद मिसळून दूध देण्याचीही आपल्याकडे प्रथा आहे. असे केल्याने जखम भरून यायला मदत होते. हळदीचा लेप दिल्याने वेगाने जखम भरून येते.


हळदीचे दुध त्वचेच्या आजारामध्ये रामबाण उपायाचे काम करते. त्‍वचेवरील नको असलेले केस हटवण्‍यासाठी कोमट खोबरेल तेलात हळद पावडर टाकून त्‍याची पेस्‍ट करून हातापायावर लावावे. त्‍यामुळे त्‍वचा मुलायम तर होतेच त्‍याशिवाय त्‍यावरील नको असलेले केसही हळूहळू कमी होतात.


हळदीच्या दुधामुळे लिव्हर मजबूत होते. लिव्हरशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी हळदीचे दुध उत्तम उपाय आहे.
मधुमेही रूग्‍णांसाठी हळद हे औषधापेक्षाही जास्‍त गुणकारक आहे. मधुमेह असणा-या लोकांनी दररोज गरम दूधात हळद टाकून दूध प्‍यावे. हळदीमध्‍ये वातनाशक गुण असल्‍यामुळे मधुमेहाची समस्‍या असणा-यांना याचा चांगलाच फायदा होतो.


थोडे नवीन जरा जुने