असं काय आहे की ज्यामुळे व्यायाम केल्याने डोके एकदम शांत होते?अनेक धावपटूंचं असं म्हणणं आहे की,जेंव्हा ते धावायला सुरूवात करतात,तेंव्हा त्यांचा मूड थोडयाच वेळात एकदम ठीक होतो. धावल्यामुळे तुम्हाला एकदम बळकटी आल्यासारखे वाटते. तुम्ही जर तणावात असाल तर एकदा धावण्याचा व्यायाम घेऊन बघा,तणाव कमी होताना दिसेल. यामुळे हे एकदम स्पष्ट होते की,व्यायामामुळे मूड एकदम सुधारतो.असं काय आहे की ज्यामुळे व्यायाम केल्याने डोके एकदम शांत होते? काही रसायने त्याला कारणीभूत आहेत.
तुमच्या मूडवर तुमच्या मेंदूतील न्यूरोकेमिकल प्रभाव टाकतात. सेराटोनिन,एपाइनफ्रिन,डोपामाइन आणि एंडोर्मफिन यामुळे तुमचा मूड सुधारतो.हे चारही न्यूराकेमिकल्स व्यायामाने वाढतात.शारीरिक आरेाग्य आणि स्वास्थ तज्ञ क्लेरी डोराटिक याबद्दल आधिक माहिती देत आहेत.

सेराटोनिनमुळे मूड सुधारतो

सेराटोनिनमुळे मूड सुधारतो. दम लागत असेल तर तेही कमी होते. हे रसायन निर्माण होण्यासाठी लांब अंतरावर धावण्याचा व्यायाम घ्या किंवा एक प्लेट पास्ता खा.मित्र अथवा कुटुंबासमवेत वेळ घालविल्यानंतर जी भावना निर्माण होते,ती भावना या रसायनामुळे होते. भुकेले असाल आणि लो काबरेहायड्रेट असतील तर हे रसायन कमी होते.
एपाइनफ्रिनमुळे मार्ग सुचतो

संघर्षाच्या काळात हे रसायन उपयोगी आहे. तुम्ही जर कोठे अडकले असाल तर तुम्हाला पळून जाण्यासाठी मार्ग सुचविण्यासाठी हे रसायन महत्वाचे ठरते. यामुळे हृदयाचे ठोके,रक्तदाब,आणि शरीराचे तपमान वाढते. रोजच्या धावपळीच्या जीवनात या रसायनाचा अनुभव तर रोजच घ्यावा लागतो. व्यायाम केल्यामुळे या रसायनात वाढ होते.


झोप आणणारे डोपामाइन

झोप येण्यासाठी हे रसायन महत्वाचे आहे. झोपणे अथवा जागे होण्याच्या वेळेत गडबड असेल तर निश्चित समजा की डोपामाइनचे असंतुलन झाले आहे. तणाव,भुकेजलेले राहणे आणि जेवणात काबरेहायड्रेटचे प्रमाण जर कमी असेल तर याचे प्रमाण कमी होते. विमानप्रवास केल्यानंतर जेटलॅग समस्या म्हणतात ती हीच. तुम्ही जर बराच वेळ व्यायाम करत असाल आणि तोच जर तुमचा नियम असेल तर अशा प्रकारच्या रसायनात वृद्धी होते.


वेदना पळविणारे एंडोरफिन

शरीरात जर वेदना असतील तर त्या कमी करण्याचे काम एंडोरफिन करते. व्यायामामुळे याचे शरीरातील प्रमाण वाढते. मद्यपानामुळे या रसायनाची पातळी कमी होते. धावपटूंमध्ये हे रसायन योग्य प्रमाणात असते. जेवढे धावाल तेवढे या रसायनाचे प्रमाण वाढते. हे एक नैसर्गिक पेनकिलर आहे. अर्थात जर धावण्याचा व्यायाम जास्तच करत असाल तर झोपेचे वेळापत्रक बिघडून जाईल. संतुलनासाठी योग्य प्रमाणात धावणे केंव्हाही चांगले.


ध्यानधारणा

नियमितपणे ध्यानधारणा करणे सुद्धा तणाव घालवण्याची चांगली पद्धत आहे. यामुळे मूडही चांगला राहतो. तज्ज्ञांच्या मते, ध्यानधारणा केल्याने वायफळ चिंता आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते. ही पद्धत एखाद्या अँटिडिप्रेसेंटच्या रूपात काम करते. तसेच यामुळे एकाग्रताही वाढते आणि तणाव घालवण्यासाठी आवश्यक असलेली मन:शांतीही मिळते.थोडे नवीन जरा जुने