कोणत्या वेळी शॉवर घेणे उत्तम राहते...सकाळी की रात्री?
कोणत्या वेळी शॉवर घेणे उत्तम राहते...सकाळी की रात्री? पहिल्यांदा वाचताना हा एखादा सामान्य प्रश्न वाटतो. परंतु हा प्रश्न तुम्ही तुमच्या ग्रुपमधील लोकांना विचारल्यास त्यांच्याकडून तुम्हाला दोन प्रकराची उत्तरे मिळतील.
रात्रीच्या वेळी शॉवर घेणाऱ्या लोकांचे उत्तर असेल की, रात्री शॉवर घेतल्याने दिवसभराचा थकवा आणि दुर्गंध दूर होतो. सकाळी शॉवर घेणाऱ्या लोकांच्या मतानुसार,
रात्रभर घामाने त्रस्त झालेल्या शरीराला सकाळचा शॉवर आवश्यकच आहे. परंतु यामध्ये कोणत्या लोकांचे उत्तर बरोबर आहे? चला तर मग जाणून घेऊया शॉवर घेण्याची योग्य वेळ सकाळ की रात्र...

शॉवर घेण्याची वेळ स्थितीवर आवलंबून आहे. उदा. तुमच्या त्वचेचा प्रकार, तुमच्या कामाचा प्रकार तसेच तुम्ही किती प्रदूषण आणि धुळीच्या संपर्कात येता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शॉवर घेण्यासाठी योग्य वेळेची कशी निवड कराल...


जर तुम्ही सकाळी शेव करत असाल -
पुरुषांना सकाळी शेव करण्यासाठी सर्वात चांगली वेळ शॉवर घेताना किंवा घेतल्यानंतरची आहे. शॉवर घेतल्याने शेव मुलायम होते. त्यामुळे जे लोक दररोज सकाळी शेव करतात त्यांनी सकाळी शॉवर घेणे उत्तम राहते.


तुमची त्वचा तेलकट असेल -

एका रिसर्चनुसार तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी सकाळी शॉवर घेणे जास्त फायदेशीर राहते. यामुळे त्यांची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.


जे लोक सकाळी लवकर उठतात

जे लोक सकाळी लवकर झोपेतून उठतात त्यांच्यासाठी सकाळी शॉवर घेणे चांगले राहते. परंतु स्नूझ बटनचा वापर करणाऱ्या लोकांसाठी हा चांगला पर्याय नाही.


जर तुम्हाला रात्री जास्त घाम येत असेल
ज्या लोकांना रात्री झोपल्यानंतर जास्त घाम येतो, त्यांनी सकाळीच शॉवर घेणे चांगले राहते. परंतु जे लोक रात्री शॉवर घेऊन झोपतात आणि त्यांना जास्त घाम येत नसेल तर त्यांच्यासाठी सकाळी शॉवर घेणे आवश्यक नाही.


तुम्ही रात्रीच्या वेळी शॉवर घ्यावा, पण...

अनेक लोकांना रात्रीच्या वेळी शॉवर घेणे अल्हाददायक आणि सहज वाटते. परंतु काही शोध सांगतात की, रात्रीच्या वेळी शॉवर घेणे तुमच्या शरीरातील तापमानात बदल करू शकते, ज्यामुळे शरीराचा नैसर्गिक लय बाधित होऊ शकतो आणि झोप लागण्यात अडचण निर्माण होऊ शकते.

तर मग सकाळी की रात्री शॉवर घेण्याचा निर्णय आपल्या शरीर आणि दिनचर्येनुसार घ्यावा. परंतु जास्त वेळेस स्नान करण्यापासून दूर राहा. जास्त वेळेस स्नान केल्याने तुमच्या शरीरातील गुड बॅक्टिरिया, जे तुमच्या त्वचेचे रक्षण करतात ते नष्ट होऊ शकतात आणि यामुळे त्वचा संक्रमण होण्याची शकयता वाढते.थोडे नवीन जरा जुने