त्वचा तेलकट असो किंवा ड्राय, त्वचेशी संबधित काही समस्या दूर करण्यासाठी वाचात्वचा तेलकट असो किंवा ड्राय, त्वचेशी संबधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त प्रदूषणाचाही त्वचेवर वाईट प्रभाव पडतो. अशा परिस्थितीमध्ये त्वचेचे रक्षण करण्यासाठी दुध सहायक ठरू शकते.

दुधामुळे त्वचेचे केवळ पोषणच होत नाही तर त्वचा उजळही होते. येथे जाणून घ्या, दुधाचे काही खास घरगुती उपाय, ज्यामुळे तुमची त्वचा उजळ राहील.

1. तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर रात्री दुधामध्ये काजू भिजवून ठेवा. सकाळी भिजवलेले काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती मिसळून पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. आता हे मिश्रण चेहरा, हात, पायावर लावा. थोड्यावेळाने पाण्याने धुवून घ्या. या उपायाने त्वचा उजळ होण्यास मदत होईल.

2. गुलाबपाणी त्वचेला मुलायम आणि गुलाबी ठेवते. गुलाबपाण्यामध्ये दुध मिसळून याचा उपयोग केल्यास आणखी जास्त लाभ होईल. गुलाबपाण्यात थोडेसे दुध मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर कांती येईल.

3. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दुधाची साय घेऊन त्यामध्ये हळद मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा धुवून घ्या. यामुळे तुमचा चेहरा लवकर उजळेल.

4. तुमची त्वचा ड्राय असेल तर दुधाची साय आणि मध एकत्र करून हे मिश्रण त्वचेवर लावा. या उपायाने त्वचेचा ड्रायनेस नष्ट होईल.


5. एक वाटीत 2 चमचे दूधाची साय घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून चांगल्याप्रकारे फेटावे. तयार झालेले मिश्रण संपूर्ण चेहर्‍यावर 5 ते 10 मिनिटे लावून मसाज करावी. 10 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा. या फेसपॅकमध्ये लींबू असल्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ होतो. त्वचा मुलायम होऊन चमकते.


6. चेहर्‍यावर डाग, पुरळ, सुरुकुत्या असतील तर दोन बारीक केलेले बदाम, दोन चमचे दुध आणि एक चमचा वाळलेल्या संत्र्याच्या सालीचे चूर्ण एकत्र मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणाने चेहर्‍यावर हलक्या हाताने थोडावेळ मालिश करा. काही दिवस नियमित हा उपाय केल्यास फरक जाणवेल.


थोडे नवीन जरा जुने