जेवण करताना पाणी पिणे योग्य की अयोग्य




पाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. इतकेच नाही तर त्वचाही तजेलदार आणि निरोगी राहते. दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.

हे तर सर्वांना माहित आहे की पाणी हे एक उत्तम पेय आहे, पण काही लोक म्हणतात जेवण करताना पाणी प्यायला पाहिजे. काही लोक म्हणतात जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे. परंतु आयुर्वेदाप्रमाणे जेवताना शक्यतो पाणी पिण्याचे टाळावे.

अन्न बराच वेळ पोटात राहिले तर शरीराल पोषण जास्त मिळेल. जर जेवताना जास्त पाणी प्यायले तर अन्न लगेच पोटात खाली जाईल, जर पाणी प्यायचेच असेल तर थोडे प्यावे आणि कोमट पाणी प्यावे.

खूप थंड पाणी घेऊ नये. पाण्यात ओवा टाकून ते उकळून घ्यावे. अन्न पचण्यासाठी हे मदत करते. जेवण करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर किंवा जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे.

स्वस्थ राहायचे असेल तर देवाने दिलेल्या या देणगीचा भरपूर वापर करा. पाणी पिल्याने पचनक्रिया योग्य पद्धतीने चालते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिल्याने पोट साफ राहते.


थोडे नवीन जरा जुने