या लहान बदलांमधील काही संकेतांच्या मदतीने हृदयरोगांचा वेळीच अंदाज लावता येतोदररोज धावपळीच्या आयुष्यात त्याचा दबाव कायम हृदयावरच पडतो. अशाने व्यक्ती हृदयरोगाने पीडित होतो. या धोक्यापासून वाचण्यासाठी सर्वात आधी हृदयाची स्थिती समजण्याची गरज आहे. शरीरात होणार्‍या लहान बदलांमधील काही संकेतांच्या मदतीने हृदयरोगांचा वेळीच अंदाज लावता येतो.
केस कमी होणे

हृदयाशी संबंधित आजार असल्यास शरीरात रक्तप्रवाह कमी होतो. असे झाल्याने केस वेगाने गळू लागतात. जेव्हा जास्त केस गळण्याची समस्या होते तेव्हा हृदयाचे चेकअप करणे आवश्यक आहे, पण केस गळणे हे प्रत्येकवेळी हृदयरोगाशी संबंघित असते असे नाही, परंतु 40 टक्के प्रकरणात हे लागू होते.

काय करावे : आपल्या कुटुंबाची वैद्यकीय हिस्ट्री तपासून घ्यावी. केस गळण्याचा आजार तुमच्या कुटुंबात वंशपरंपरागत असू शकतो. परंतु तुमच्या कुटुंबात हृदयरोगाची समस्या पूर्वीपासून असू शकते.
जोरात घोरणे
अटलांटामधील इमोरी विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार जर व्यक्ती जास्त प्रमाणात घोरत असले तर याचा अर्थ आहे की त्या व्यक्तीचे हृदय जास्त संघर्ष करत आहे. अशा व्यक्तीमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजार होण्याचा धोका जास्त असतो.

काय करावे : आपल्या झोपण्याच्या पद्धतीला ठीक करावे. चांगल्या झोपेसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम करावा. असे केल्याने हृदयाला आराम मिळतो.


अर्धशिशीचा त्रासअमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या संशोधनानुसार डोकेदुखी किंवा अर्धशिशीची (मायग्रेन) समस्या हृदयरोगाचे लक्षण असू शकते. हृदयाला पुरेसे रक्त न मिळाल्याने डोकेदुखी होऊ शकते.

काय करावे : डोकेदुखीच्या इशार्‍याला वेळीच समजा. फक्त मायग्रेनचा उपचार करत असल्यास हृदयाची तपासणी करून घ्या.


वैवाहिक जीवनात तणाव

उथा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार लग्नानंतर जास्त तणावग्रस्त वाटणे हृदयरोगाचे लक्षण असू शकते. लग्नानंतर होणारे शारीरिक आणि मानसिक बदलांचा हृदयावर विपरीत परिणाम होत असतो.

काय करावे : लग्नानंतर नियमित व्यायाम करत राहावे. आठवड्यातून तीन वेळा योगा , कमी कोलेस्टेरॉल असणारा आहार घ्यावा.थोडे नवीन जरा जुने