गरोदरपणात महिलांनी अशी काळजी घ्या
गरोदर असताना महिलांना काळजी घेणे गरजेचे असते एखादी छोटीशी चूक गरोदर महिलांसाठी धोकादायक ठरू शकते. या काळात महिलांनी योग्य आहार, भरपूर झोप, व्यायाम आणि डॉक्टरांकडून चेकअप करणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडे तपासणी करणे जेवढे जरुरी आहे तेवढेच महत्त्वाचे आहे स्वत:ची काळजी स्वत: घेणे.

1- आहाराकडे ठेवा लक्ष -

या काळात महिलांना योग्य आहार घेणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही एखाद्या डायटेशियनकडून डायट चार्ट बनवून घ्या. डॉक्टरांनी जरी तुम्हाला बाहेरचे पदार्थ खाण्याची परवानगी दिली तरी तुम्ही बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. बाहेरील पदार्थ तुमच्यासाठी नुकसादायी ठरु शकतात. या काळात डायजेसटिव्ह सिस्टिम कमजोर झालेली असते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाताना ऑयली आणि अनहाइजेनिक नसावे. उन्हाळ्यात पदार्थ लवकर खराब होत असल्याने या दिवसामध्ये बॅलेंस्ड डाएट घ्यावा आणि आहारातील कॅलरीची मात्रा कमी करावी.

2- झोपण्याची स्थिती

गरोदर काळात महिलांनी पाठीवर जास्त काळ झोपू नये. पाठीवर जास्तकाळ झोपल्याने मणक़्यावर जास्त दबाव पडतो. डाव्या कुशीवर झोपणे योग्य. डाव्या कुशीवर झोपल्याने शरिरात ऑक्सीजनचा प्रवाह वाढण्यास मदत होते.


3- अल्कोहलचे सेवन टाळावे...

गरोदर महिलांनी स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करणे टाळावे. या काळात असे सेवन करणे तुमच्या आणि बाळासाठी घातक ठरु शकते. तुम्हाला जर खुपच मद्य पिण्याची इच्छा झाल्यास तुम्ही एक छोटा ग्लास रेड वाईन पिऊ शकता. या काळात मद्या ऐवजी फळांचा ज्युस पिणॆ फायद्याचे असते. महिलांनी या काळात कॉफी पिणे टाळावे.


4 - रोज फिरायला जा...

गरोदर महिलांनी सकाळ-संध्याकाळ फिरायला गेले पाहिजे. फिरल्याने पायांच्या मांसपेशि मज़बूत होतात आणि प्रसुतीच्या वेळी जास्त त्रास होत नाही. नवीन व्यायाम सुरू करण्याआधी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.


5 - वाचन करा..

रिलॅक्स होण्यासाठी गरोदर महिलांनी पुस्तके वाचली पाहिजे. सकाळ संध्याकाळ पुस्तके वाचल्याने तुम्चा मूड फ्रेश होण्यास मदत होईल. हिंसा आणि जास्त भाबनिक कथा वाचणे टाळावे.


6- संगीत ऐका...

या काळात महिलांनी हलके संगीत ऐकावे. संगीत ऐकल्याने मुड फ्रेश होण्यास मदत होते.थोडे नवीन जरा जुने