खजूर खाण्याचे हे 5 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल !
लहान मुले आणि महिलांनी खजूर खाल्ल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. खजुरात ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्व आणि लोह असते. खजुरामुळे आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजूराला पूर्ण अन्न म्हटले जाते.

ज्या मुलांना लवकर थकवा येतो किंवा जी कमकुवत आहेत, त्यांनादेखील खजूर खाल्ल्यानंतर काही दिवसांतच फायदा व्हायला लागतो.
लहान मुलांना नेहमीच पोट फुगण्याचा किंवा अपचनाची समस्या होते. खजूर खाल्ल्यास त्या दूर होतील. वस्तुत: खजुरातील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. २-३ खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यांची पचनक्रिया चांगली राहते आणि त्यांना पोषणदेेखील मिळते.
खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. सोबतच यामध्ये सोडियमदेखील आढळते. ही दोन्ही पोषक द्रव्ये मज्जासंस्था योग्य पद्धतीने काम करण्यात मदत करतात. यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास होतो आणि ते अभ्यासावर उत्तम पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकतात.
एनिमिया झाल्यास डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात. याने शरीराला पुरेसे लोह मिळते. ज्या मुलांना एनिमिया आहे त्यांच्यासाठी खजूर फायद्याचे आहेत. तुमच्या मुलाच्या छातीत दुखत असेल खजूराने फायदा होईल.


थोडे नवीन जरा जुने