मधाचे असे सेवन केल्यास तुम्हाला मिळेल हा फायदा
मधाला आयुर्वेदामध्ये विविध आजारांवर रामबाण औषधी मानले गेले आहे.यामध्ये फ्रुक्टोज, ग्लूकोज, सुक्रोज, माल्टोज इ. शर्कारांचे मिश्रण आहे. मधामध्ये 75 टक्के शर्करा असते.


या व्यतिरिक्त यामध्ये प्रोटीन, एल्बुमिन, वसा, एंजाइम अमीनो एसिड, कार्बोहायड्रेट, पराग, केशर, आयोडीन आणि लोह, तांब, पोटॅशिअम, सोडियम, फॉस्फोरस, कॅल्शियम, क्लोरीन इ. आरोग्यदायी पोषक तत्व आढळून येतात.

तसेच बहुमुल्य व्हिटॅमिन ए, बी-1, बी-2, बी-3, बी-5, बी-6, बी-12 आणि व्हिटॅमिन सी, एच भरपूर प्रमाणात असते. मधाचे तुम्ही विविध उपाय, फायदे ऐकले असतील परंतु आज आम्ही तुम्हाला मधाचे जे खास उपाय सांगत आहोत, जे तुम्हाला कदाचित माहिती नसावेत.

जर तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचे असेल आणि चेहऱ्यावर पिंपल असतील तर थोडासा मध चेहऱ्यावर अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि फरक पाहा.

कफची समस्या असेल तर एक चमचा आणि थोडेसे खोबरेल तेल मिसळून घेतल्यास आराम मिळेल.

दोन थेंब मध हातावर घेऊन त्यामध्ये तेवढेच कोमट पाणी घ्या. या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धवून घ्या. या उपायाने चेहरा उजळ होईल.

थकवा जाणवत असेल तर एक चमचा मध खा. थोड्याच वेळात शरीरात एनर्जी जाणवेल, उत्साह संचारेल.

दररोज वयोमानाप्रमाणे 1 ते 2 तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.


शुगर फ्री ऐवजी डायबिटीजच्या रुग्णांनी खाण्यामध्ये मधाचा वापर करावा. कारण मध रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतो.

शरीरावर एखादी जखम झाली असेल तर त्यावर अँटीबॉयोटिक क्रीम प्रमाणे मधाचा वापर केला जाऊ शकतो, कारण मध एक नैसर्गिक अँटीबॉयोटिक आहे. दारोज जखमेवर मध लावल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते.
एक चमचा मधामध्ये थोडेसे पाणी मिसळून हे मिश्रण केसांना शँपू लावण्यापूर्वी लावावे. थोड्यावेळाने केस स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने केस सिल्की आणि चमकदार होतील.

मध, व्हिनेगर आणि पाणी समान मात्रेमध्ये घेऊन हे मिश्रण घरातील बागेतील झाडांसाठी वापरा. हे एक नैसर्गिक कीटकनाशक स्वरुपात काम करते.


गाजराच्या रसामध्ये दोन लहान चमचे मध घालून ते नियमित प्राशन केल्यास दृष्टी क्षमता वाढते तसेच डोळ्यांना पाणी येणे यांसारखे आजार बरे होण्यास मदत होते.

आयुर्वेदामध्ये उच्च रक्तदाबासाठी मधाचा उपयोग करणे अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. दोन लहान चमचे मध एक चमचा लसणाच्या रसामध्ये नियमित घेतल्याने रक्तदाब संतुलित राहतो.


जर तुम्हला रात्री लवकर झोप लागत नसेल तर एक चमचा मधामध्ये थोडेसे मीठ टाकून हे मिश्रण घ्या. या उपायाने शांत झोप लागेल.
जर तुम्ही स्वत:ला फिट आणि सडपातळ ठेवू इच्छित असाल तर रोजच्या आहारात साखरेऐवजी मधाचा वापर सुरु करा आणि फरक पाहा.

थोडे नवीन जरा जुने