चाळीशी नंतरही तरुण दिसायचंय मग हे करा
सकस आहारामुळे वर्षभर संपूर्ण शरीराला शक्ती मिळते. यामुळे हिवाळा ऋतूचा संपूर्ण फायदा प्रत्येकाने घ्यावा आणि अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे तरुण आणि चाळीशीच्या वर असलेल्या लोकांनाही तारुण्याचा पूर्ण आनंद घेता येईल.

यासाठी आज आम्ही तुम्हला अशा काही आहाराची माहिती देत आहोत, ज्यामुळे बळ, बुद्धी, वीर्य, पौरुषत्व वाढेल आणि वर्षभर तारुण्य कायम राहील.

1. हरभरे -
रात्री मुठभर हरभरे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हरभरे पाण्यातून काढून या पाण्यात एक चमचा मध टाकून पाणी पिउन घ्या आणि हरभरे चावून-चावून खाऊन टाका. हा उपाय तुम्ही उन्हाळ्यातही करू शकता. अशाप्रकारे हरभरे खाणारा व्यक्ती नेहमी तारुण्याचा अनुभव करतो.
2. उडीद
ज्या लोकांची पचनशक्ती चांगली असेल त्यांनी हिवाळ्यात नियमितपणे उडदाची डाळ छीलाक्यासहित खावी. मुठभर उडीद रात्री पाण्यात भिजवून सकाळी बारीक करून घ्या. त्यानंतर यामध्ये मध मिसळून या मिश्रणाचे सेवन करा. त्यानंतर एक ग्लास दुध प्यावे. या उपायाने शरीर बलिष्ठ होईल आणि पौरुषत्वही वाढेल.
3. अंजीर आणि दुध
रात्री 4 अंजीर पाण्यात भिजवून ठेवा. अंजीर शोषून घेईल तेवढेच पाणी टाकावे. सकळी नाश्त्यामध्ये हे अंजीर खावेत आणि त्यावर दुध प्यावे. तुम्ही हे अंजीर उडीद डाळीसोबतही खाऊ शकता. या उपायाने तरुणच नाही तर पन्नाशीच्या वर असलेल्या लोकांनाही तारुण्याचा पूर्ण आनंद घेता येईल.
4. पेंडखजूर
दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन किंवा पाच पेंडखजूर दुधात उकळून खाव्यात आणि दुध प्यावे. यामुळे शरीर पुष्ट होईल, पौरुषत्व वाढेल. हा आहार तुम्ही लहान मुलानाही देऊ शकता, यामुळे लहान मुले अंथरून ओले करणार नाहीत आणि हिवाळ्यातील आजारांपासून दूर राहतील.
5. मनुका
दुधामध्ये दहा मनुका उकळून त्या चावून-चावून खाव्यात आणि तेच दुध पिउन घ्यावे. हा उपाय तुम्ही पेंडखजूरसोबतही करू शकता. यामुळे शरीरातील गरमी वाढेल आणि ज्या लोकांना थंडीचा खूप त्रास होतो त्यांना आराम मिळेल. या उपायाने बळ, वीर्य वाढेल.
थोडे नवीन जरा जुने