करिना कपूर झीरो फिगरसह प्रेक्षकांच्या भेटीलाकरिना कपूरने आपल्या झीरो फिगरसह प्रेक्षकांना अभिनयाच्या रंगात रंगवून टाकलं आहे. मुलगा तैमूरच्या जन्मानंतरही ती तितकीच समरसून काम करते. करिना कपूर 'अंग्रेजी मीडियम'मधून रसिकांसमोर येत आहे. यात ती लंडनमधल्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
करिना कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मध्यंतरी 'वीरे दी वेडिंग'सारख्या चित्रपटात तिने वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली. तर अशी ही हरहुन्नरी आणि कलासक्त अभिनेत्री 'अंग्रेजी मीडियम'मधून रसिकांसमोर येते आहे. यात ती इरफान खानसोबत काम करते आहे. 'अंग्रेजी मीडियम'मध्ये इरफानसह करिना झळकणार असल्याचं कळल्यानंतर अनेकांनी कान टवकारले होते. मात्र आपण हा चित्रपट का स्वीकारला हे करिना कपूर स्पष्ट करते. ती सांगते, या चित्रपटात माझी विशेष भूमिका आहे.

 मी या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. मला इरफान खानसोबत काम करायचं होतं आणि याच कारणामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटात मी लंडनमधल्या पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा करते आहे. एका मुख्य प्रवाहातल्या अभिनेत्रीसाठी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणं हे खूप मोठं आव्हान असतं. काही चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी पोलिसाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटांमध्ये त्या मुख्य भूमिकेत होत्या; पण 'अंग्रेजी मीडियम'मध्ये मी लंडनमधली पोलीस आहे. मला लंडनमधल्या पोलिसाची भूमिका साकारण्याची खूप इच्छा होती. इरफानसोबत काम करणं आणि लंडनमधल्या पोलिसाची भूमिका मिळणं, हे दोन्ही योग एकत्र जुळून आले आणि मी या चित्रपटाला होकार दिला.

इरफान खानसोबत काम करण्याचा अनुभव वर्णन करताना ती सांगते, मी शाहरूख, सलमान आणि आमिर खानसोबत काम केलं आहे. फक्त इरफानसोबत काम करायचं राहून गेलं होतं. तो जबरदस्त अभिनेता आहे. इरफानसोबत काम करण्याची संधी पुन्हा मिळेल की नाही, याबाबत शंका होती. त्यामुळे अंग्रेजी मीडियमबाबत मी मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही.
थोडे नवीन जरा जुने