अनेक वेळा हे दुखणे मोठ्या आजाराचा संकेत असू शकतो


शरीराचा एखादा भाग दुखू लागल्यावर अनेक जण वैद्यकीय सल्ला न घेता पेनकिलरच्या गोळ्या घेतात. हे योग्य नाही. अनेक वेळा हे दुखणे आजाराचा संकेत असू शकतो.


पोटदुखी
2007 मध्ये गायनोकोलॉजिस्ट कॅन्सर फाउंडेशनने केलेल्या संशोधनानुसार पोटात दीर्घकाळापासून दुखणे, जेवण करताना त्रास, शौचावेळी दुखणे असा त्रास होत असल्यास ही ओवेरियन कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

काय करावे : लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच उपचार केल्यास 90 टक्के समस्या दूर होते. त्याचप्रमाणे संबंधित दुखण्याचे कारण माहीत होते.


पाठदुखी
पाठदुखीसोबत पाय सुन्न होत असतील तर हे रक्तसंचार प्रभावित होण्याची लक्षणे असू शकतात. जेव्हा पाठीच्या कण्यावर दाब पडतो त्यावेळी ही लक्षणे दिसतात. पाठीच्या कण्यात पातळ डिस्कची भूमिका महत्त्वाची असते. हे डिस्क स्पंज कुशनप्रमाणे काम करतात.

काय करावे : ऑर्थोपेडिकचा सल्ला घ्यावा. घरगुती उपाय करण्याचे टाळावे. एक्स-रे किंवा एमआरआय चाचणी करून नेमका त्रास जाणून घ्यावा.


पायदुखी
पायाच्या पोटर्‍या दुखणे, सुजणे किंवा दुखणार्‍या भागाची त्वचा लाल होणे ही लक्षणे डीपवेन थोंबोसिसची असू शकतात. याला ब्लडक्वॉट(रक्तगुटळ्या) असे सुद्धा म्हणतात. जे लोक एकाच ठिकाणी बसून काम करतात त्यांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो.

काय करावे : कामाच्या मध्ये थोडा ब्रेक घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे नियमित अंतराने पाय मोकळे करावेत. गरजेनुसार बॉडी मसाज सुद्धा करावी.


छातीत दुखणे
छातीत जळजळणे किंवा दुखण्याचा त्रास खास करून तिखट जेवण घेतल्यानंतर होतो. हा त्रास हृदयरोगाचे कारण ठरू शकते. तुमचे वय 45 पेक्षा जास्त असेल आणि असा त्रास सातत्याने होत असल्यास हृदय रोगाची शक्यता जास्त असते.

काय करावे : साधा आहार घेण्यासोबत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. हृदयाची चाचणी करून घ्यावी.
थोडे नवीन जरा जुने