रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नारळाचे तेल असे आहे फायदेशीर


रोगप्रतिकारशक्ती वाढवून आरोग्य आणि फिटनेसचे अधिक फायदे मिळवण्यासाठी एक्झॉटिक खाद्यपदार्थावर खर्च करायला हवा, असा एक गैरसमज आपल्याकडे पसरतोय. पण, वर्षानुवर्षे भारतीय घरांमध्ये आणि विशेषत: स्वयंपाकघरात असं एक सुपरफूड वापरलं जातंय. खरं तर, सुपरफूड ही संकल्पना आणि त्याचं वेड हे फार अलीकडचं आहे. पण, भारतीय घरांमध्ये नारळाचं तेल हे सुपरफूड प्राचीन काळापासून एक विश्वासार्ह घटक म्हणून वापरलं जातंय.


गेल्या काही वर्षातील संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की, नारळाच्या तेलातून अनेकविध लाभ मिळतात. कोणतीही उष्ण पद्धत न वापरता अगदी नैसर्गिकरीत्या खोब-यापासून कोल्ड प्रेस्ड व्हर्जिन कोकोनट ऑईल काढले जाते. तेल काढण्याच्या या पद्धतीमुळे व्हिटॅमिन ई आणि खनिजांसारखे त्यातील सर्व नैसर्गिक लाभदायक घटक कायम राहतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक मीडिअम चेन फॅटी अ‍ॅसिड्स (एमसीएफए) हा घटक कोल्ड प्रेस्ड व्हर्जिन कोकोनट ऑईलमध्ये मुबलक प्रमाणात आढळतो.


लाभ :

कोकोनट ऑईलमध्ये लॉरिक अ‍ॅसिड, कॅप्रीलिक अ‍ॅसिड आणि कॅप्रिक अ‍ॅसिड हे एमसीएफ आढळतात.

>नारळाच्या तेलात असणारे लॉरिक अ‍ॅसिड आणि त्याच्या मोनोग्लीसराईडमुळे त्यातील लिपिड पापुद्रय़ाचे विभाजन होऊन त्यातून विविध प्रकारचे लिपिड कोटेड बॅक्टेरिया तयार होतात.

>यातील मोनोलॉरिन अँटिव्हायरस म्हणून काम करते आणि लिपिड व फॉस्फोलिपिड्सच्या पापुद्रय़ात लपलेल्या जीवाणूंचा नायनाट करते. जीवाणूंचे कवच असलेले लिपिड या घटकामुळे नष्ट होते.

>मोनोलॉरिनमुळे पेशीतील पापुद्र्य़ाचे सतत स्त्रवणे वाढते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. एचआयव्ही, नागीण, गोवर, व्हेस्क्युलर सोमायटिस अशा विविध जीवाणूंची संख्या मोनोलॉरिनमुळे कमी होते, असेही दिसून आले आहे.

>कोल्ड प्रेस व्हर्जिन कोकोनट ऑईलमध्ये एमसीटी (मीडिअम चेन ट्रायग्लीसराइड फॅट्स) हा घटक असतो. यामुळे यकृताची स्वच्छता होते. या प्रकारचे फॅट शरीरात फारच सहज शोषले जाते, त्यामुळे हे अत्यंत आरोग्यकारी फॅट समजले जाते.

>नारळाच्या तेलातील एमसीएफएमुळे मायक्रोबायल ऑर्गनिझम्समधील पापुद्रय़ांना हानी पोहोचते आणि ते नष्ट होतात. त्यामुळे जीवाणूंच्या शृंखलेत जाऊन हा घटक त्यांची निर्मिती थांबवतो.

मात्र, कोणत्याही आजारावर नारळाचे तेल हा काही जादूई उपाय नाही. त्यामुळे, आरोग्यदायी फॅट्स, धान्य, पालेभाज्या असा समतोल आहार घेतल्याने रोगप्रतिकारशक्तीला बळकटी मिळते. नारळाचे तेल रोजच्या स्वयंपाकात वापरता येते किंवा दररोज सकाळी एक चमचा प्यायल्यास उत्तम.
थोडे नवीन जरा जुने